वन्य प्राण्यांमुळे हानी झाल्यास मिळणार आर्थिक मदत

वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने कुठल्याही प्रकारची घटना घडली तर मिळणार

वन्यप्राणी आर्थिक मदत : वन्य प्राण्यांमुळे जर हाणी झाल्यास उदा. पशुधन मृत अथवा अपंग जखमी झाल्यास आर्थिक देण्यात येत होती, हि मदत रक्कम वाढविण्यात आली आहे.“वन्यप्राणी आर्थिक मदत”

तरस, कोल्हा, वाघ, हत्ती, बिबट्या, रानडुक्कर, गवा (बायसन) मगर, लांडगा, रानकुत्रे, कोल्हा, या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य हाणी किंवा पशुधन हानी झाली तर हि मदत देण्यात येत होती. हि मदत खालीलप्रमाणे.

दि. 02/07/2010
दि. 30/03/2013
दि. 29/05/2013
दि. 16/01/2015
दि. 11/01/2016
दि. 28/11/2016

या तारखेच्या शासन निर्णय मधील तरतुदीनुसार हानी झालेल्या व्यक्तीस आर्थिक मदत देण्यात येत होती. हि मदत कमी असल्यामुळे ती वाढवण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.

वन्यप्राणी आर्थिक मदत?

शासन निर्णय दिनांक 11/11/2016 नुसार जर गाय, बैल, मेंढी, बकरी, म्हैस किंवा इतर पशुधन मृत किंवा अपंग किंवा जखमी झाल्यास संबंधित व्यक्तीला आर्थिक मदत देण्यात येत आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पशुधन मृत अपंग जखमी मनुष्यहानी झाली तर देण्यात येणारी आर्थिक मदत ही कमी असल्यामुळे त्यामध्ये 23 ऑगस्ट 2022 शासन निर्णयामध्ये वाढ करण्यात आली आहे.

शासन निर्णय पहा - येथे क्लिक करून GR पहा

नवीन शासन निर्णयानुसार देण्यात येणारी आर्थिक मदत?

  • व्यक्ती मृत झाल्यास – २० लाख रुपये आर्थिक मदत नवीन शासन निर्णयानुसार दिली जाते. त्यापैकी दहा लाख रुपये देय असलेलेया व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे आणि उर्वरित रक्कम १० लाख रु. त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव (Fix Deposit) जमा करण्यात यावी. तसेच
  • व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास मिळणारी आर्थिक मदत – १ लाख २५ हजार रुपये.
  • व्यक्तीस कायम अपंगत्व प्राप्त झाल्यास – ५ लाख रुपये.
  • व्यक्ती किरकोळरित्या जखमी झाल्यास – औषधे उपचारासाठी येणारा खर्च, खाजगी दवाखान्यात उपचाराची आवश्यकता असल्यास त्याची मर्यादा २० हजार रुपये प्रति व्यक्ती.
हे पण वाचा »  येथून चेक करा नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे आले का? | Nuksan Bharpai Status

पशुधनासाठी मिळणारी आर्थिक मदत पाहण्यासाठी : 23 ऑगस्ट 2022 चा शासन निर्णय पहा.

Related Posts...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *