ई श्रम कार्ड रजिस्ट्रेशन 2024, येथून नोंदणी करा : E Shram Card Registration

e shram card yojana

E Shram Card Registration : नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण ई श्रम कार्ड कसे काढायचे आणि त्याबद्दल माहिती सविस्तर माहिती.

श्रम कार्ड योजना माहिती. ई श्रम कार्ड पोर्टल हे श्री. भूपेंद्र यादव व माननीय मंत्री (L&E) यांच्या हस्ते २६ ऑगस्ट २०२१ रोजी उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. रामेश्वर तेली, मा.राज्यमंत्री (L&E) हे उपस्थित होते. e Shram पोर्टल हे असंघटीत कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी विकसित केले आहे.

E Shram Card Registration Information in marathi

E-Shram Portal वरती कामगारांचे नाव,व्यवसाय,शैक्षणिक पात्रता,पत्ता,कौशल्य,कुटुंब तपशील इ. समावेश असेल. शैक्षणिक पात्रता,कौशल्य याच्या आधारे त्यांना काम/रोजगार दिला जाईल. तसेच सामाजिक सुरक्षा, कामगारांसाठी विविध असणाऱ्या योजनांचा लाभ घेता.यामुळे कामगारांना याचा फायदा होणार आहे. तसेच आपण नोंदणी “E Shram Card Registration” केल्यानंतर कामगाराला PMSBY अंतर्गत अपघात संरक्षण विमा दिला जातो.

योजनेचे नावई श्रम कार्ड योजना
नोंदणी करण्याची पद्धतऑनलाईन
e shram card yojana 2024

जर अपघातामध्ये मृत्यू झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व झाल्यास २ लाख रुपये विमा दिला जातो. अपघातामध्ये अंशत: अपंगत्व झाल्यास १ लाख रुपये विमा दिला जातो. भविष्यात काही आपत्ती किंवा महामारी सारखी कठीण परिस्थिती निर्माण झाल्यास सरकारकडून मदत मिळण्यासाठी सोपे होईल.

E Shram Card Registration Online Maharashtra

E-Shram Portal वरती २६ ऑगस्ट २०२१ पासून E-Shram पोर्टल वर नोंदणी सुरु करण्यात आली आहे. कामगार स्वतः पोर्टल वरती नोंदणी करू शकतात. परंतु स्वतः नोंदणी करणे शक्य नसल्यास CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) ला भेट देऊन आपले इ-श्रम नोंदणी करू शकतात.

देशभरात ४ लाखांहून अधिक CSC /SSK केंद्रामध्ये हि सेवा सुरु आहे. तसेच निवडक टपाल कार्यालये असंघटीत कामगारांना नोंदणीसाठी मदत करत आहेत. नोंदणी करण्यासाठी स्वतः व्यक्ती असणे गरजेचे आहे. आपण इ-श्रम पोर्टल वरती नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कार्ड सुद्धा मिळते. हे कार्ड तुम्ही प्रिंट करून ठेऊ शकता. तसेच हे कार्ड देशभरात हे कार्ड मान्य असेल.

ई श्रम कार्डसाठी पात्रता? (e shram card eligibility in marathi)

ई श्रम पोर्टल वरती नोंदणी करण्यासाठी खालील कामगार पात्र असतील.

स्थलांतरित कामगार,बांधकाम कामगार,कृषी कामगार,रिक्षा चालक आणि असंघटीत क्षेत्रातील तत्सम इतर व्यवसायात गुंतलेले इतर कामगार, ड्रायव्हर, दुधवाला,मनरेगा कामगार,अंगणवाडी कर्मचारी,मच्छिमार,रस्त्यावर विक्री करणारे,भाजी फळे विक्रेते, घरगुती कामगार इतर असंघटीत कामगार E Shram पोर्टलवरती नोंदणी करू शकतात.

वयाची अट? (e shram card age limit in marathi)

ई श्रम पोर्टल नोंदणी करण्यासाठी असा कोणताही कामगार जो असंघटीत क्षेत्रात काम करीत आहे. त्याचे वय १६ ते ५९ दरम्यान असणे बंधनकारक आहे.

ई श्रम कार्ड साठी कोणते व्यक्ती अपात्र असतील?

  • ई श्रम कार्ड काढण्यासाठी कामगार Income Tax/ आयकर भरणारा नसावा.
  • तसेच EPFO आणि ESIC सदस्य नसावा.

NDUW Important Link

Sr.No.DetailsImp Link
1)e-Shram – Digital Seva Portal (CSC)Click Here
2)NDUW OfficialClick Here
3)e-Shram Card – Self RegisterClick Here
e shram card apply online

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *