मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, राज्यातील महिलांसाठी राज्य शासनाने सुरु केली आहे. या योजनेतून पात्र असणाऱ्या महिलांना १५०० रुपये दार महिन्याला दिले जातात. हि योजना महिलांसाठी सुरु केली असून या योजनेचे १ जुलै २०२४ पासून ऑनलाईन अर्ज सुरु झाले होते. आता ऑनलाईन अर्ज भरणे बंद आहे. परंतु आता योजनेतील सर्व नोंदणीकृत महिलांना ई-केवायसी करावी लागणार आहे.
Ladki Bahin Yojana KYC लाडकी बहिण योजना हि महाराष्ट्र शासनाची महत्वपूर्ण योजना आहे. जी राज्यातील महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून सक्षम करण्यासाठी सुरु केली आहे. या योजनेच्या पात्र सर्व लाभार्थी महिलांना आता e-KYC करावी लागणार आहे.
ladkibahin.maharashtra.gov.in ekyc
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची केवायसी करण्यासाठी शासनाने वेबसाईट वरती e-KYC पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायाद्वारे महिला केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. शासनाच्या असे निदर्शनास आले आहे कि, योजनेमध्ये काही महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसून देखील योजनेचा लाभ घेत आहेत. यामुळे शासनाने आता केवायसी प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे आता केवायसी करणाऱ्या लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
लाडकी बहिण योजना केवायसी म्हणजे काय? आणि ती का करायची?
योजनेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थींना नियमितपणे, आर्थिक लाभ मिळावा याकरिता ई केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दोन महिन्यात केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठीहि मदत होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना केवायसी हि एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे, यामुळे शासनाला लाभार्थी पात्र आहे कि नाही हे समजते. केवायसी केल्यामुळे लाभार्थीच्या खात्यावरच लाभ जमा होतो. तसेच केवायसी केल्यामुळे लाभार्थीची नोंदणी हि एकदाच होते, दोन वेळा अर्ज केला असेल तर तो ओळखला जातो, यामुळे प्रत्येक लाभार्थीने हि केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. केवायसी न केलेल्या लाभार्थीना योजनेचा लाभ मिळणार नाही, योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीने केवायसी करणे आवश्यक आहे.
- योजनेचा लाभ मिळण्यासाठी केवायसी करावी लागणार.
- यामुळे लाभार्थीची आधार आणि इतर माहितीची पडताळणी होते.
- योजनामधून दरमहा पैसे मिळण्यास मदत होते.
- फसवणूक टाळण्यासाठी सरकार कडून ओळख निश्चित होते.
लाडकी बहिण योजनेची केवायसी कुठे करावी?
लाडकी बहिण योजनेची केवायसी करण्यासाठी शासनाने https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या पोर्टल वरती पर्याय दिलेला आहे. लाभार्थींनी फक्त शासनाच्या अधिकृत पोर्टल वरतीच केवायसी करावी. किवा केवायसी करण्यासाठी अधिकृत शासनाची https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc हि वेबसाईट आहे. सदर वेबसाईट वरून लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
लाडकी बहिण योजाना केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे माहिती.
लाडकी बहिण योजनेची केवायसी करण्यासाठी लाभार्थीकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी महिलेची आधार कार्ड
- महिला विवाहित असल्यास पतीचे आधार कार्ड.
- अविवाहित असल्यास वडिलांचे आधार कार्ड.
- आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर.
लाडकी बहिण योजना केवायसी कशी करावी?
केवायसी करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- केवायसी करण्यासाठी सर्व प्रथम लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत e-KYC वेबसाईट ओपन करा.
- लाडकी बहिण योजना ई-केवायसी शासनाची अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc
- वेबसाईट ओपन केल्यानंतर “e-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” हे पेज ओपन होईल.
- सर्वप्रथम लाभार्थीचा आधार क्रमांक विचारला जाईल. त्याठिकाणी लाभार्थीचा आधार क्रमांक टाकून घ्यावा.
- कॅप्चा कोड चौकानात भरा.
- आधार प्रामाणिकरणासाठी मी सहमत आहे हा पर्याय निवडून ओटीपी पाठवा वरती क्लिक करा.
- आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी येईल तो टाकून सबमिट करा.
- त्यानंतर वडिलांचा/पतीचा आधार क्रमांक विचारला जाईल.
- त्याठिकाणी पतीचा/वडिलांचा आधार क्रमांक टाकून घ्या.
- कॅप्चा कोड भरा आणि ओटीपी पाठवा वरती क्लिक करा.
- आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती सहा अंकी ओटीपी येईल तो टाकून सबमिट करा.
- आपल्याला एक छोटासा फॉर्म पाहायला मिळेल. त्यामध्ये आपली वैयक्तिक माहिती विचारली जाईल.
- फॉर्म मधील सर्व माहिती अचूक भरावी. एकदा माहिती भरून फॉर्म सबमिट केल्यानंतर पुन्हा त्यामध्ये बदल करता येणार नाही.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा. अशा प्रकारे लाभार्थी मोबाईल वरून केवायसी करू शकतात.