Mahaurja Login Registration; येथून करा सोलर पंपसाठी ऑनलाईन अर्ज
Mahaurja Login Registration : शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी “Mahaurja Login Registration” ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत, परंतु ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अनेक जणांना योजनेची वेबसाईट मिळत नाही. यालेखामध्ये आम्ही तुम्हाला योजनेसाठी अर्ज कोणत्या साईटवर करायचा व अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
Mahaurja Login Registration Online Maharashtra
शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम सोलर योजना महत्वाची ठरली आहे. शेतकऱ्यांना योजनेमधून सौर कृषी पंप दिला जातो, यासाठी त्यांना ९०% ते ९५% अनुदान शासनाकडून दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना फक्त लाभार्थी हिश्शाची उर्वरित ५% ते १०% रक्कम भरावी लागते. पीएम कुसुम सोलर योजनेचे दि.१७ मे २०२३ पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरु झाले आहेत. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास कुसुम महाऊर्जाच्या साईटवरती ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड, जमिनीचा ७/१२ उतारा, पासपोर्ट आकाराचा एक फोटो, बँक खाते पासबुक (IFSC कोड सहित), क्षेत्र जर सामाईक असेल तर त्यासाठी २०० रुपयाचे मुद्रांक कागदावर इतर भोगवटादाराचे ना हरकत/संमतीपत्र प्रमाणपत्र, पाण्याचा स्रोत-विहीर बोअरवेल, शेततळे इतर सामाईक हिस्सा असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
योजनेचे नाव | पीएम कुसुम सोलर योजना “PM Kusum Solar Yojana“ |
अर्ज सुरु दिनांक | १७ मे २०२३ |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्जदार लॉगइन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
PM Kusum Solar Registration
शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या साईटवर नोंदणी “mahaurja beneficiary registration” करावी लागेल, त्यानंतर लॉगइन पोर्टल वरती लॉगइन करून अर्ज भरता येईल. अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे स्कॅनिंग करून ठेवावी. त्यानंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी ज्यामुळे अर्ज भरताना अडचण येणार नाही.
Mahaurja beneficiary login
अर्जदार नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी https://kusum.mahaurja.com/beneficiary/ या साईटवर लॉगइन “mahaurja beneficiary login” करावे. नोंदणी झाल्यानंतर जर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड मिळाला नाही तर तुम्ही पासवर्ड विसरलात (Forgot Password) या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करताना दिलेला मोबाईल नंबर टाकून Send OTP वरती क्लिक करावे. मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो टाकावा आणि नवीन पासवर्ड टाकावा.
- पुन्हा लॉगइन पेज ओपन करावे, युजरनेममध्ये नोदणी करताना दिलेला मोबाईल नंबर टाका आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.
- लॉगइन झाल्यानंतर तुम्हाला अर्ज करण्यासाठी पर्याय दिसेल. अर्ज भरण्यापूर्वी ७/१२ उताऱ्यावर पाण्याच्या स्त्रोताची नोंद आहे का चेक करावे.
- तसेच कागदपत्रे अपलोड करताना सर्व कागदपत्रे अपलोड झाले का? हे चेक करा, एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.