पिक विमा अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ; Pik Vima Date Extended
Pik vima date extended : नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पिक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरु झाले असून अर्ज अंतिम मुदत हि १५ जुलै २०२४ देण्यात आली होती, परंतु आता हि मुदत वाढविण्यात आली असून शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने पिक विमा अर्ज भरता येणार आहे.
पिक विमा योजना मुदतवाढ Pik vima date extended 2024
राज्यात पिक विमा भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा केंद्रावर लाभार्थींची गर्दी होत आहे, यामुळे अर्ज भरताना कागदपत्रे अपलोड होण्यास तसेच अर्ज भरताना अडचणी येत आहेत. पिक विमा भरल्यानंतर शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाल्यास संबधित विमा कंपनीकडून शेतकऱ्याला झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळू शकते. यासाठी लाभार्थी शेतकऱ्याने पिक विमा अर्ज भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आता काळजी करण्याची गरज नाही, कारण शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. (माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज सुरु पहा)
पिक विमा भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हि मुदतवाढ देण्यात आली आहे, यापूर्वी शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज भरण्यासाठी दि. १५ जुलै २०२४ मुदत देण्यात आली होती, परंतु आता दि. ३१ जुलै २०२४ पर्यंत मुदत वाढविण्यात आली. शेतकऱ्यांनी विहित कालावधी मध्ये पिक विमा अर्ज भरणे गरजेचे आहे.