ई पिक पाहणी नवीन वर्जन आले आहे | e pik pahani new version
e pik pahani new version : अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची माहिती, इ-पिक पाहणी करण्यासाठी नवीन ॲप आले आहे.
नवीन ॲपमध्ये शेतकऱ्याला पिक पाहणी करणे तसेच इतर महत्वपूर्ण माहितीचा समावेश केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिक पाहणी करण्यासाठी अडचण येणार नाही.
इ-पिक पाहणी ॲप शेतकऱ्यांना प्ले स्टोअर वरती आता उपलब्ध आहे. २.०.० हे या ॲप शेतकरी प्ले-स्टोअर वरून घेऊ शकतात. तसेच https://epeek.mahabhumi.gov.in/mis/ वेबसाईट वरतीसुद्धा उपलब्ध आहे. या नवीन ॲपमध्ये शेतकऱ्याला सोप्या पद्धतीने पिक पाहणी करता येणार आहे.
नवीन काय? | e pik pahani new version
- नवीन ॲप मध्ये गटामधील मध्यबिंदू याचे अक्षांश आणि रेखांश हे समविष्ट केलेले आहेत.
- Geo Fencing सुविधा. पिक पाहणी करीत असताना त्याच गटात क्षेत्रात पिक पाहणी करावी लागेल. यामुळे पिकाचा फोटो आणि क्षेत्राची अचूक माहिती मिळेल.
- गटाचे क्षेत्र सोडून इतर ठिकाणी पिक पाहणी केल्यास तशी शेतकऱ्याला सूचना दिली जाईल.
- नवीन ॲप मध्ये मदत हा पर्याय दिलेला आहे. येथे शेतकरी आपले प्रश्न विचारू शकतात.
- इ पिक पाहणी मध्ये पिकाची नोंद हि स्वयं प्रमाणित मानण्यात येणार आहे.
- तलाठी यांचेमार्फत किमान १०% नोंद तपासणी.
- संपूर्ण गावची पिक पाहणी यादी पाहण्याची सोय उपलब्ध.
- शेतकरी स्वत: ४८ तासात खातेदार पिकाची माहिती दुरुस्त करू शकतात.
इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचे १.०.०.७ हे वर्जन प्ले स्टोरवरून हटविण्यात आले आहे. परंतु यामध्ये शेतकऱ्याला पिक पाहणी करीत असताना अडचणी येत आहेत. १.०.०.७ मध्ये नवीन नोंदणी करीत असताना इंटरनेट आवश्यक आहे हा प्रोब्लेम येत होता.
आता नवीन ॲप version २.०.० द्वारे पिक पाहणी करू शकतात. हे ॲप प्ले स्टोर वरती दि. ३० जुलै २०२२ रोजी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या नवीन सुविधेचा लाभ घ्यावा. आपले पिक पाहणी नवीन ॲपवरून करावे.
इ पिक पाहणी | e pik pahani हे नवीन वर्जन शेतकऱ्याला ३० जुलै २०२२ रोजी खरीप हंगाम २०२२ पिक पाहणी करण्यासाठी प्लेस्टोर वरती अपडेट केले आहे.
नवीन ॲपमध्ये शेतकरी आपल्या गावातील किती शेतकऱ्यांनी पिक पाहणी केली याची यादी सुद्धा पाहता येणार आहे.
नवीन ॲप वरती पिक पाहणी कशी करावी यासाठी येथे क्लिक करा.