100 टन एकरी ऊस उत्पादन मिळविण्यासाठी संपूर्ण माहिती

100 ton sugarcane per acre

sugarcane 100 tonnes per acre एकरी १०० टन उस उत्पादन काढण्याचे उपाय याची सविस्तर माहिती ३ भागांमध्ये दिलेली आहे. भाग नं. -१

 • जमीनीचे आरोग्य व्यवस्थापन कसे करावे.
 • जमिनीची मशागत कशी करावी.
 • उस लागवडीचे हंगाम.
 • ऊस वाणाची निवड कशी करावी.(भाग क्र. २ वाचा)

जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन

पाचट कुजवण्याचे फायदे :
 • खोडवा पिकांमध्ये पाचटाचा अच्छादन म्हणून वापर होतो त्यामुळे पाण्याची बचत होते.
 • हिरवळीचे खत तसेच शेणखतासाठी लागणाऱ्या खर्चात बचत होते.
 • उसाच्या पाचटापासून हेक्टरी ४ ते ५ तन सेंद्रिय खत मिळते. यामुळे वेगळे सेंद्रिय खते घालण्याची गरज नाही.
 • प्रती हेक्टरी १० टन पाचटामध्ये ४०-५० किलो नत्र,२०-३० किलो स्फरद आणि ७५-१०० किलो पालाश असते.
पाचट जाळण्यामुळे होणारे नुकसान :
 • प्रामुख्याने वायू प्रदूषणामध्ये वाढ होते.
 • पाचटातील मौल्यवान सेंद्रिय कर्बाचा नाश होतो.
 • पाचट जाळण्यामुळे पाचटातील अन्न-घटकांचा नाश होतो.
पाचट कुजविण्याची प्रक्रिया :

ऊस तुटलेनंतर शिल्लक राहिलेले ऊसाचे बुडके धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत. तुटलेल्या बुडख्यांवर ०.१ टक्के बाविस्टीनची फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणा-या बुरशीजन्य रोगाचा प्रतिबंध होतो. शेतात प्रति एकर अंदाजे ४ टन पाचट असते. या प्रति एकर पाचटासाठी ४५ किलो युरिया, ५० किलो सुपर फॉस्फेट समप्रमाणात पाचटावर टाकावे व नंतर ५ किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन समप्रमाणात टाकावे. त्यानंतर पहिले पाणी दयावे. ऊस तुटून गेल्यानंतर पहिल्या १५ दिवसांमध्ये ही क्रिया करावी.

हिरवळीची खते :
 • हिरवळीचे खतासाठी ताग, धैँचा, चवळी, उडीद यासारखी पिके घ्यावीत.१.५ ते २.०० महिन्याच्या कालावधीत ही पिके जमीनीत गाडून द्यावीत.
 • जवळपास हेक्टरी २५ ते ३० टन बायोमास आणि ८० ते ९० किलो नत्र हिरवळीचे खतातून उपलब्ध होते.
 • शेणखतासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
 • हिरवळीची पिके जमीनीत गाडल्यानंतर १ महिन्याने नांगरट व कुळवणी करावी.
 • हिरवळीचे पिक आगोदर घेणे शक्य नसल्यास लागवडीच्या वेळी ताग किंवा धैंचा आंतरपीक घेऊन जमिनीत गाडावा.
 • ऊस तूटून गेल्यानंतर मार्च व एप्रिल महिण्याचे पहिल्या आठवडयात ताग / चैंचा प्रति एकरी ४० किलो बियाणे प्रमाणे पेरणी करावी व पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी पीक फुलो-यात असताना नांगरणी करून जमिनीत गाडावे.

सेंद्रीय खते – कंपोस्ट खत, लेंडीखत, शेणखत, मासळीखत या खतांचा देखील उपलब्धतेनुसार वापर करावा. जेणेकरून जमीनीच्या सुपीकर्तत वाढ होऊन जमीनीचा कर्ब सुधारेल.

जमिनीची मशागत कशी करावी.

 • ऊसाच्या लागवडीसाठी मध्यम जमीनीत १०० ते १२० सेमी. व भारी जमिनीसाठी १२० ते १५० सेमी अंतरावर सरी पाडावी.
 • उतारानुसार सरीची लांबी २० ते ४० मीटर ठेवावी.
 • जोडओळ पट्टा पध्दतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ फुटावर व भारी जमिनीसाठी ३ फुटावर सलग स-या पाडणे, २ सरीमध्ये ऊसाची लागण करून १ सरी रिकामी सोडावी.
 • रिकाम्या सरीमध्ये दोन्ही बगलेला आंतरपिक किंवा हिरवळीच्या खतासाठी चैंचा किंवा तागाची लागवड करावी. ५) अडसाली ऊसामध्ये सोयाबीन, भुईमूग, चवळी इ. अंतरपिके घेता येतात.

ऊस लागवड हंगाम

 • आडसाली – १५ जुलै ते १५ ऑगस्ट
 • पूर्वहंगामी – १५ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर
 • सुरु ऊस – १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी
 • खोडवा – १५ फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या ऊसाचाच खोडवा ठेवणे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *