आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे हे कसे पहायचे?

Check aadhaar linking status with bank

Check aadhaar linking status with bank : प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेचे शेतकऱ्यांचे २००० रु चा हप्ता आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहेत.

आपले आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे. याचे स्टेटस आपण मोबाईल वरून कसे पाहणार याची संपूर्ण महिती येथे पाहणार आहोत.

या लेखामध्ये काय आहे?

Check aadhaar linking status with bank

कोणत्या बँकेत आधार कार्ड लिंक आहे हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

महत्वाचे : आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. जर आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण चेक करू शकणार नाही.
  • UIDAI च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. UIDAI अधिकृत वेबसाईट : https://uidai.gov.in/
  • वरील वेबसाईट वरती तुम्हाला MY Aadhaar मध्ये Check Aadhaar/Bank Linking Status हा पर्याय शोधा.
  • आधार कार्ड शी कोणती बँक लिंक आहे हे तपासण्यासाठी लिंक – येथे क्लिक करा.

मित्रांनो मोबाईलमध्ये My Aadhaar App च्या माध्यमातूनसुद्धा आपण चेक करू शकता. यासाठी प्ले स्टोर वरून My Aadhaar हे App घ्या.

  • वरील वेबसाईट वरती तुम्ही आधार कार्ड नंबर किंवा व्हर्चुअल आय डी ने सुद्धा चेक करू शकता.
  • आधार नंबर टाकून खालील सेक्युरिटी कोड टाका.
  • Send OTP वरती क्लिक करा. आधार कार्डशी लीन असलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी OTP जाईल हा OTP टाका.
  • पुन्हा Submit बटन वर क्लिक करा.
  • आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये आपले आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे. त्या बँकेचे नाव पाहायला मिळेल.

हे तपासल्या नंतर आपण बँकेत जाऊन चेक करू शकता.

महत्वाचे : जर आपले आधार कार्ड कोणत्याच बँक खात्याशी लिंक नसेल तर आपण जवळील बँकेत जाऊन आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड (NPCI) लिंक करून घ्यावे. कारण आपण PM Kisan योजनेची KYC केली असेल तर Payment Mode : Account बदलून Payment Mode : Aadhar झालेला आहे. त्यामुळे आता ज्या बँकेत आपले आधार कार्ड लिंक असेल त्याच खात्यात पैसे जमा झालेले असतील.”check aadhar card bank linking status

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *