लाभार्थी निवड प्रक्रिया सुरु; शेळी मेंढी, गाई म्हैस, कुक्कुटपालन योजना

mahabms list

Navinya Purna Yojana list : गाई-म्हैस, शेळी-मेंढीआणि कुक्कुटपालन घटकासाठी ah.mahabms.com वरती ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

या लेखामध्ये काय आहे?

Navinya Purna Yojana (mahabms list)

निवड झालेल्या लाभार्थ्यांना एस एम एस पाठविण्यात आले आहेत. परंतु जर तुम्हाला एसएमएस (SMS) आले नसतील तर आपण निवड यादी मध्ये आपले नाव चेक करू शकता. ज्या अर्जदारांनी सन २०२१-२२ मध्ये अर्ज केले आहेत. २०२१-२२ मधील प्रतीक्षाधीन यादीमधील अर्जदारांना प्रथम प्राधान्य त्यांना देण्यात येणार आहे.

पात्र ठरलेल्या लाभार्थ्याला “QP-EVDTEC” या नावाने SMS प्राप्त येईल, तसेच त्यांना पोर्टल वरती कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पर्याय देण्यात येईल. लाभार्थीने आवश्यक कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करावी. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी दि.२३ जानेवारी २०२३ ला ah.mahabms.com साईट वरती ऑप्शन दिला जाईल.

तुम्हाला जर निवड झालेला मेसेज नाही आला तर आपण पोर्टल वरती आपला आधार कार्ड नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करून पाहू शकता.

कागदपत्रे अपलोड करण्याचा कालावधी हा ८ दिवसांचा होता म्हणजेच दि. २३ जानेवारी २०२३ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधी मध्ये लाभार्थीने पोर्टल वर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. परंतु हि मुदत ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. कागदपत्रे कोणती अपलोड करावी याबाबत पोर्टल वरती योजना या ऑप्शनमध्ये आपण अर्ज केलेली योजना निवडा व त्यामध्ये कागदपत्रे पर्यायमध्ये संपूर्ण कागदपत्रे यादी दिलेली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *