तहसीलदार यांचेकडील उत्पन्न दाखला असा काढा : Income Certificate Maharashtra

Income Certificate Maharashtra

Income Certificate Maharashtra : उत्पन्नाचा दाखला शासकीय कामासाठी, शैक्षणिक कामासाठी किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी बऱ्याचदा उत्पन्नाचा दाखला मागितला जातो. हा उत्पन्नाचा दाखाला काढण्यासाठी काय प्रोसेस करावी लागते याबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे.

Income Certificate Maharashtra

तहसीलदार यांचेकडील उत्पनाचा दाखला शैक्षणिक, योजना इ. करिता लागतो. उत्पन्नाचा दाखला म्हणजेच कुटुंबाचे वर्षाचे सर्व ठिकाणावरून मिळणारे आर्थिक उत्पन्न हे या दाखल्यामध्ये दिलेले असते. काही ठिकाणी तलाठी उत्पन्न दाखला (income certificate online maharashtra) चालतो, तर काही ठिकाणी तहसीलदार उत्पन्न दाखला.

तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी अर्जदाराला महा ई सेवा केंद्र किंवा सेतूमध्ये जावून अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच तलाठी यांचेकडील उत्पन्नाचा अहवाल लागतो. हा अर्ज नागरिक मोबाईल वरून सुद्धा काढू शकतात या करिता शासनाने नागरिकांसाठी आपले सरकार महा ऑनलाईन https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हे पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.

आपले सरकार महा ऑनलाईन पोर्टल वरती नागरिकांना विविध शासकीय दाखले इतर उपयुक्त अशा सेवा वितरीत केल्या जातात. उदा. दुकान परवाना, शासकीय दाखले, ग्रामपंचायत सेवा इ. तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा याकरिता हा लेख संपूर्ण वाचा.

Tahsildar Utpanna cha dakhla – Talathi Utpanna Dakhala

तहसीलदार यांचेकडील उत्पन्न दाखला काढण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला तलाठी यांचेकडून उत्पन्नाचा अहवाल काढावा लागेल. तलाठी यांचेकडील उत्पन्नाचा अहवाल कसा काढायचा? माहितीसाठी – येथे क्लिक करा

उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे (income certificate documents marathi)

  • अर्जदाराचे आधार कार्ड/Pan कार्ड/मतदान कार्ड
  • तलाठी उत्पन्न दाखला/अहवाल/आयकर विवरणपत्र
  • एक फोटो
  • रेशन कार्ड/७/१२, ८ अ उतारा/लाईटबिल/कर पावती,
  • रहिवाशी घोषणापत्र

उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा?-१ (income certificate apply maharashtra)

  • उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल वरती https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि साईट सुरु करावी.
  • त्यानंतर तुम्हाला लॉगइन करण्यासाठी पर्याय दिसेल. त्यावरती नवीन युजर? येथे नोंदणी करा खाली दाखवल्याप्रमाणे पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक करून नोंदणी करून घ्या.
income certificate process
income certificate process
  • नोंदणी “income certificate online apply” करण्यासाठी दोन पर्याय येतील त्यामधील पहिला पर्याय १ निवडा. आणि आपला जिल्हा व मोबाईल नंबर टाकून OTP पाठवा या बटनवरती क्लिक करा.
  • त्यानंतर ओटीपी टाका आणि कोणतेही युजरनेम टाकू शकता. त्याखाली लगेच पासवर्ड टाकण्यासाठी पर्याय येईल. त्यामध्ये लक्षात राहिला असा पासवर्ड टाकून घ्या.
  • त्यानंतर इंग्रजीमध्ये आपले नाव टाकावे. पुढच्या चौकानात मराठीत नाव येईल.
  • लगेच पुढच्या चौकोनात आपली जन्मतारीख टाका. खालील चौकोनात क्लिक करून नोंदणी करा या बटनवरती क्लिक करावे.
  • आपली नोंदणी यशस्वी होईल. त्यानंतर आपण पुन्हा होम पेज सुरु करायचे आहे. व नोंदणी करतेवेळी टाकलेले युजरनेम आणि पासवर्ड टाका तसेच जिल्हा निवडून लॉग इन करा.

उत्पन्नाचा दाखला अर्ज कसा भरावा?-२ (income certificate application online)

  • लॉग इन झाल्यानतर तुम्हाला अनेक ऑप्शन पाहायला मिळतील. त्यामधून आपण महसूल विभाग “Revenue Department” वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यामध्ये तुम्हाला उपविभागामध्ये (महसूल सेवा) Revenue Services हा ऑप्शन निवडावा लागेल.
  • महसूल सेवामध्ये (Revenue Services) उत्पन्न दाखला-income certificate हा ऑप्शन दिसेल तो निवडा आणि पुढे जा (Proceed) ऑप्शन वर क्लिक करा.
  • पुन्हा तुम्हाला उत्पन्न दाखला पर्याय निवडा लागेल आणि पुढे जा बटन वरती क्लिक करावे लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार याची माहिती दिसेल. त्यानंतर Continue ऑप्शन वरती क्लिक करा.
  • मोबाईलमध्ये एक नवीन फॉर्म सुरु ओपन होईल. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला उत्पन्न दाखला किती वर्षाचा काढायचा आहे हे निवडावे लागेल. उदा.१ वर्ष, ३ वर्ष
  • अर्जदाराची वैयक्तिक माहिती, अर्जदाराचा पत्ता, कुटुंबाची माहिती, उत्पन्न दाखला कोणासाठी काढायचा आहे व कारण इ. माहिती व्यवस्थित अचूक माहिती भरावी.
  • शेती असेल तर त्याबद्दल माहिती भरावी लागेल. त्यानंतर उत्पन्नाबद्दलची माहिती भरावी. व आपण तलाठी उतपन्न दाखला सोबत जोडणार असाल तर तलाठी अहवाल पर्याय निवडावा.
  • अटी मान्य आहे चौकोनात क्लिक करावे. व त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

कागदपत्रे अपलोड कशी करावी?

  • सर्वप्रथम अर्जदाराचा फोटो व सही अपलोड करायची आहे.
  • वरती सांगितलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • कागदपत्रे अपलोड करण्याची सूचना वाचूनच कागदपत्रे अपलोड करावी. “tahsildar income certificate” फोटो व सही तसेच इतर कागदपत्रे याचा सुचणेनुसार असावा.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल. शुल्क भरल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल.
how to get income certificate from tahsildar online?

The complete process of extracting income certificate from Tehsildar is given here for detailed information read the entire article.Read More

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *