येथून चेक करा नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे आले का? | Nuksan Bharpai Status
Nuksan Bharpai Status : नुकसान भरपाई अनुदान मिळण्यासाठी मागच्या काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी अर्ज भरून दिले होते, नुकसान भरपाई “Nuksan Bharpai Status” अनुदान मिळण्यासाठी अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांनी केवायसी म्हणजेच आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे.
Nuksan Bharpai Anudan
शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईचे स्टेटस मोबाईल वरती चेक करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान भरपाई “Nuksan Bharpai Status” अनुदान जमा झाले कि नाही, जमा झाले असेल तर कोणत्या बँक मध्ये जमा झाले, बँक खाते नंबर, नुकसान भरपाई अनुदान कधी जमा झाले? याबद्दल संपूर्ण माहिती शेतकरी मोबाईल वरती फक्त काही मिनिटामध्ये चेक करू शकतात.
नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांना केवायसी/आधार प्रमाणीकरण झाल्यानंतरच जमा होते, यामुळे शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण/केवायसी करणे गरजेचे आहे. अन्यथा नुकसान भरपाईचे अनुदान मिळणार नाही. शेतकऱ्यांनी केवायसी/आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शेतकऱ्याच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये अनुदान काही दिवसामध्ये जमा होते.
Nuksan Bharpai Status
नुकसान भरपाई अनुदानाचे स्टेट्स चेक करण्यासाठी शेतकऱ्याकडे विशिष्ट क्रमांक (VK Number) असावा, विशिष्ठ क्रमांकाद्वारे आपण नुकसान भरपाई अनुदानाचे स्टेट्स चेक करता येईल. स्टेटस चेक करण्यासाठी (गट नंबर टाकून आपल्या जमिनीचा नकाशा पहा) आपण खालील स्टेप फॉलो करा.
- नुकसान भरपाई अनुदानाचे स्टेट्स चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल. त्याठिकाणी तुम्हाला VK Number विचारला जाईल, त्या चौकोनात तुम्हाला VK Number (विशिष्ट क्रमांक) भरावा लागेल.
- VK Number/विशिष्ट क्रमांक तुम्हाला ज्याठिकाणी तुम्ही केवायसी केली, त्याठिकाणी तुम्हाला तुमचा लिस्टमधील VK Number/विशिष्ट क्रमांक मिळेल.
- विशिष्ट क्रमांक भरून Submit बटन वरती क्लिक करा. तुम्हाला नुकसान भरपाई अनुदानाचे स्टेटस पाहायला मिळेल.