ई पीक पाहणी 2026-27 अशी करा : Digital Crop Survey (DCS MH) | Pik Pahani Maharashtra

E PIK PAHANI

Pik Pahani Maharashtra : पिक पाहणी 2026-27 साठी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नोंदणी आता Digital Crop Survey (DCS MH) मोबाइल अँपद्वारे करण्यात येणार आहे. आता शेतकऱ्यांना सुद्धा मोबाईल वरून पिक पाहणी करता येणार आहे, तसेच यासाठी शासनाकडून नियुक्त करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी करून डिजिटल पद्धतीने नोंदणी करणार आहेत.

पीक पाहणी कधीपासून सुरु होणार? पीक पाहणी कोणत्या कालावधीत करायची? Digital Crop Survey (DCS MH) म्हणजे काय? पीक नोंदणीची माहिती कशासाठी वापरली जाणार? याबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे.

Pik Pahani Maharashtra 2026-27

2026-27 पासून केंद्र शासनाच्या Digital Crop Survey (DCS MH) मोबाइल अँपद्वारे पीक नोंदणी करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतः मोबाईलवरून पीक पाहणी करू शकतात. किंवा शासनाकडून नियुक्त पीक पाहणी सहाय्यक प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी करू शकतात.

पीक पाहणी सहाय्यक शेतातील प्रत्यक्ष पिकांची माहिती पाहून ती DCS-MH मोबाइल अँपमध्ये डिजिटल स्वरूपात नोंदवणार आहेत. गट क्रमांक/सर्वे क्रमांकनिहाय प्रत्यक्ष पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून Crop Registry अद्ययावत करण्यात येणार आहे.

Digital Crop Survey (DCS MH) म्हणजे काय?

Digital Crop Survey (DCS MH) म्हणजे शेतातील प्रत्यक्ष पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदविण्याची प्रक्रिया होय. यामध्ये शेतकरी/पीक पाहणी सहाय्यक प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन शेतातील पिकांची पाहणी करतील आणि उपलब्ध माहितीनुसार पिकांची नोंद DCS-MH मोबाइल अँपमध्ये करतील. संकलित करण्यात आलेल्या या माहितीचा उपयोग विविध शासकीय योजना आणि कृषीविषयक कामांसाठी केला जाणार आहे.

हे पण वाचा »  येथून चेक करा नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे आले का? | Nuksan Bharpai Status

पीक पाहणी 2026-27 कोण करणार?

2026-27 मधील Digital Crop Survey (DCS-MH) अंतर्गत पीक पाहणीचे काम पीक पाहणी सहाय्यक करणार आहेत. पीक पाहणी सहाय्यक प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन शेतातील पिकांची पाहणी करतील आणि त्यानंतर पिकांची माहिती DCS-MH अ‍ॅपमध्ये डिजिटल स्वरूपात नोंदवली जाणार आहे.

यासोबतच आता शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरूनही आपल्या शेतातील पिकांची पीक पाहणी करू शकणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः पिकांची माहिती अ‍ॅपमध्ये नोंदवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंद योग्य पद्धतीने झाली आहे की नाही, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. स्वतः पीक पाहणी करत असल्यास पिकांची अचूक माहिती नोंदवावी आणि पीक पाहणी सहाय्यकाकडून नोंद केली जात असल्यास त्यांनाही आपल्या शेतातील पिकांची योग्य माहिती उपलब्ध करून द्यावी.

पीक पाहणी सहाय्यक काय करणार?

पीक पाहणी सहाय्यकाकडून प्रामुख्याने खालीलप्रमाणे काम केले जाणार आहे.

  • प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पिकांची पाहणी करणे.
  • गट क्रमांक/सर्वे क्रमांकानुसार शेताची माहिती तपासणे.
  • शेतामध्ये कोणते पीक घेतले आहे याची माहिती घेणे.
  • प्रत्यक्ष पिकांची माहिती DCS-MH मोबाइल अॅपमध्ये नोंदवणे.
  • पिकांची माहिती डिजिटल स्वरूपात शासनाच्या प्रणालीमध्ये संकलित करणे.
  • पीक नोंदणीची कार्यवाही निर्धारित कालावधीत पूर्ण करणे

ई पीक पाहणी कधी होणार?

सुरुवात11 ऑगस्ट 2026
अंतिम मुदत10 नोव्हेंबर 2026
पिक पाहणी कोण करणारपिक पाहणी सहाय्यक
पद्धतDCS
शेतकरी स्तरावरील पिक पाहणी सुरुवात दि.11 सप्टेंबर 2026
शेतकरी स्वतः पिक पाहणी करू शकतात का?होय
पिक पाहणी अँपLink

शेतकऱ्यांनी स्वतः पीक पाहणी करायची का?

हो, 2026-27 साठी या Digital Crop Survey (DCS MH) प्रक्रियेमध्ये पीक पाहणी शेतकरी स्वतः करू शकतात. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील प्रत्यक्ष पिकांची योग्य माहिती भरावी. तसेच पीक नोंदणी केलेली माहिती योग्य प्रकारे झाली आहे का? हे चेक करणे गरजेचे आहे.

Related Posts...

Leave a Reply