तुमच पॅन कार्ड बंद तर नाही ना? आत्ताच चेक करा मोबाईलवरती : PAN Card Verification
PAN Card Verification : पॅन कार्ड हे अत्यंत महत्वाचे असे कागदपत्र आहे, बँकेत खाते उघडायचे असेल तर पॅन कार्ड मागितले जाते. अशा वेळेस आपल्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. आणि ते Active असावे तसेच पॅन कार्डला आधार कार्ड लिंक असावे.
PAN Card Verification
आपले PAN Card हे Active आहे का? हे आपण कसे चेक करणार याची सविस्तर माहिती याठिकाणी पाहणार आहोत.
कर्ज (loan) घ्यायचे असेल तर अशावेळी PAN Card कार्ड मागितले जाते. पॅन कार्ड वरून आपण या पूर्वी घेतलेल्या कर्जाची माहिती सिबिल स्कोअरद्वारे सहज उपलब्ध होते. पॅन कार्ड हे ओळखपत्राचा पुरावा म्हणून देखील वापरता येते. बँक मध्ये ५०,००० रु पुढील व्यवहार करण्यासाठी सुद्धा पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. असे पॅन कार्डचे खूप सारे फायदे आहेत.
PAN Card सुरु आहे का कसे चेक करावे?
- सर्व प्रथम https://www.incometax.gov.in/iec/foportal/ हि साईट ओपन करा.
- खालील दाखवल्या प्रमाणे Quick Link पर्यायामध्ये Verify PAN Status हा पर्याय निवडा.

- नवीन पेज ओपन होईल. आपल्याला तीन स्टेप मध्ये आपली माहिती भरावी लागणार आहे.
- खाली दाखवल्याप्रमाणे प्रथम आपला PAN Card नंबर टाका.
- नंतर जसे आपले पॅन कार्ड वरती नाव आहे, तसे नाव टाका.
- पॅन कार्ड वरील जन्म तारीख आणि मोबाईल नंबर टाका आणि Continue बटन वर क्लिक करा.

- दिलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी OTP येईल हा ओटीपी टाका आणि खालील Validate बटन वर क्लिक करा.

- PAN is Active And Details Are as Per PAN असे असेल तर आपले पॅन कार्ड सुरु/Active आहे.

