विवाह नोंदणी ऑनलाईन करता येणार : Marriage Certificate Online

Marriage Certificate Online Registration

Marriage Certificate Online Registration : विवाह नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वी आपल्याला विवाह नोंदणी करायची असल्यास ऑफलाईन ग्रामपंचायत कडे अर्ज विवाह नोंदणी फॉर्म नमुना ड ग्रामपंचायत करावा लागत असे. परंतु आता मोबाईल वरून सुद्धा विवाह नोंदणी (Marriage Registration) अर्ज करता येणार आहे.

Marriage Certificate Online Registration

मोबाईल वरून विवाह नोंदणी करणे सोपे झाले आहे. आपण घरबसल्या काही मिनिटातच नोंदणी करू शकता. यासाठी नोंदणी करण्यासाठी काय प्रोसेस आहे. याची आपण सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.

विवाह नोंदणी करण्यासाठी आपल्याला मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यामध्ये सहा स्टेप मध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. (marriage registration form)

  • जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, विवाह दिनांक, विवाह ठिकाण.
  • वराची माहिती.
  • वधूची माहिती.
  • पुरोहिताची माहिती.
  • साक्षीदाराची माहिती.
  • वधू वराचे फोटो, साक्षीदारांचे फोटो.

विवाह नोंदणीसाठी ऑनलाईन फॉर्म कुठे भरावा?

मागील काही दिवसापूर्वी आपण ग्रामपंचायतचे सर्व दाखले होणार ऑनलाईन यावरती माहिती दिली होती. आपण वरील लेख वाचू शकता. विवाह नोंदणी करण्यासाठी आपल्याला प्ले-स्टोर वरून Maha egram Citizen Connect हे अँप मोबाईल मध्ये घ्यावे लागेल.

अँपमध्ये सर्व प्रथम नवीन नोंदणी करावी लागेल. आणि एक वापरकर्ता नाव आणि पासवर्ड तयार करावा लागेल. नंतर लॉग इन करा नंतर तुम्हाला त्यामध्ये खालील प्रमाणे ऑप्शन दिसतील. सगळ्यात शेवटी एक विवाह नोंदणी अर्ज हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि तो अर्ज ऑनलाईन भरा.

Marriage Certificate Online
Marriage Certificate Online

Similar Posts

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *