येथून अर्ज करा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : Majhi Ladki Bahin Yojana Website

Majhi Ladki Bahin Yojana Website

Majhi Ladki Bahin Yojana Website : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी, मागील काही दिवसापूर्वी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली गेली, जुलै पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची वेबसाईट,याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

या लेखामध्ये काय आहे?

Ladki Bahin Yojana Online Apply Official Website

महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी शासनाने माझी लाडकी बहिण योजना सुरु केली, योजनेमधून पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. योजनेचा २८ जून २०२४ रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे. महिलांच्या आरोग्य व आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. योजनेची वेबसाईट अजून सुरु झालेली नाही सुरु झाल्यानंतर लवकरच अपडेट देऊ.

नारीशक्ती दूत अँप (Narishakti Doot) मधून अर्ज भरण्याची सुविधा सुविधा सुरु झाली आहे. अँप मधून सर्वांना अर्ज करता येईल. अँपमध्ये काही अपडेट आल्यास तुम्हाला आपल्या व्हाट्सअँप ग्रुपवरती अपडेट देण्यात येईल. वेबसाईट सुरु झाल्यानंतर आपल्या व्हाट्सअँप ग्रुपवरती अपडेट देण्यात येईल यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा.

ग्रुप जॉईन करण्यासाठी - येथे क्लिक करा.
majhi ladki bahin yojana gov in
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
वेबसाईट
अर्ज करण्यासाठी अँपNarishakti Doot
ऑफलाईन अर्ज PDFपहा
तलाठी उत्पन्न दाखला माहितीपहा
तहसीलदार उत्पन दाखला माहितीपहा
majhi ladki bahin yojana online apply

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीने ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे, अर्ज केलेल्या लाभार्थींना योजनेचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र (mazi ladki bahin yojana 2024 online apply) राज्यातील २१ ते ६५ या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या, निराधार महिला इ. या योजनेचा लाभ मिळणार आहे, तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. योजनेच्या अटी व शर्ती यासाठी आपण शासन निर्णय पाहू शकता.

Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply Link

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी अजून वेबसाईट तयार झाली नाही, वेबसाईट तयार झाल्यानंतर आम्ही आपल्या (Majhi Ladki Bahin Yojana Website) वेबसाईट www.bsaaplesarkar.in वरती अपडेट देऊ, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे, फॉर्म भरण्यासाठी लाभार्थीकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यामुळे लाभार्थींनी फॉर्म भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी.

Ladki Bahini Yojana Documents list

  • आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक (बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो १
  • उत्पन्नाचा दाखला ऐवजी केसरी/पिवळे रेशन कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १)रेशन कार्ड २)जन्म दाखला ३)मतदार ओळखपत्र ४)शाळा सोडल्याचा दाखला (पैकी १)
  • योजनेचे अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
  • ऑफलाईन अर्ज भरायचा असल्यास अर्ज नमुना

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *