माझी लाडकी बहिण योजना फॉर्म PDF हमीपत्र डाउनलोड : Majhi Ladki Bahin Yojana Form PDF
Mukhyamantri Mazi ladki bahini yojana form pdf : माझी लाडकी बहिण योजनेसाठी १ जुलै २०२४ पासून अर्ज भरणे सुरु झालेले आहेत. पात्र लाभार्थी महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लाभार्थींना जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाईन सुविधा केंद्र याठिकाणी अर्ज करता येईल.
Mukhyamantri Mazi ladki bahini yojana form pdf
राज्यातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली योजनेमधून पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रु मिळणार आहेत, योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीं ऑनलाईन अर्ज करू शकतात तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजमेमधील झालेले बदल यामुळे अर्जाच्या हमीपत्र मध्ये काही बदल केलेला आहे. यामुळे आपण नवीन फॉर्म प्रिंट काढून भरून देऊ शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना pdf फॉर्म व हमीपत्र | डाउनलोड करा |
शासन निर्णय | पहा |
तलाठी उत्पन दाखला PDF | पहा |
तहसीलदार उत्पन्न दाखला कसा काढायचा | पहा |
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आम्ही तुम्हाला याठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना pdf फॉर्म दिलेला आहे. हा फॉर्म भरून आपण संबधित अंगणवाडी केंद्रामध्ये/पर्यवेक्षिका/ग्रामपंचायत/ग्रामसेवक जमा करू शकता. ऑफलाईन अर्ज “ladki bahini yojana form” भरताना सर्व माहिती अचूक भरावी, अर्जासोबत हमीपत्रसुद्धा भरून द्यावे.
अर्जासोबत, लाभार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, एक पासपोर्ट आकाराचा फोटो, योजनेचे हमीपत्र, अधिवास प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र किंवा (मतदार ओळखपत्र/जन्म दाखला/रेशन कार्ड/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी १) , हमीपत्र आणि उत्पन्न दाखला नसेल तर (केसरी/पिवळे रेशन कार्ड) इ. कागदपत्रे जोडून अर्ज संबधित केंद्रामध्ये जमा करावा. लाभार्थी ऑनलाईन अर्ज नारीशक्ती दूत (Narishakti Doot) अँप मधून भरू शकतात, तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट सुरु झालेली नाही. वेबसाईट सुरु झाल्यानंतर अपडेट दिली जाईल, ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाभार्थीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा, अर्जाची प्रिंट काढून अर्ज संबधित कार्यालयामध्ये/केंद्रामध्ये जमा करावा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पात्रता
- महाराष्ट्र राज्यातील विवाहित महिला, परित्यक्त्या आणि निराधार महिला व विधवा महिला
- अर्ज करणाऱ्या महिलेचे वय किमान २१ वर्षे पूर्ण ते कमाल ६५ वर्षे
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कोणत्या महिला अपात्र ठरू शकतात?
- कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन २ लाख ५० हजार पेक्षा जास्त असेल तर
- कुटुंबातील व्यक्ती आयकरदाता असेल तर (Income Tax भरत असेल)
- ज्यांच्याकडे ४ चाकी वाहन कुटुंबातील सदस्याच्या नावावर असेल तर (ट्रँक्टर सोडून)
- सदर महिलेने जर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे एक हजार पाचशे (१५००/-) पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर
- ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/कॉर्पोरेशन/अध्यक्ष/उपाध्यक्ष/सदस्य/संचालक असेल तर
- कुटुंबातील सदस्य विद्यमान माझी आमदार/खासदार असेल तर
फॉर्म भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड झेरॉक्स
- बँक खाते पासबुक झेरॉक्स (बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे)
- रेशन कार्ड झेरॉक्स
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- योजनेचे अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
- ऑफलाईन अर्ज भरायचा असल्यास अर्ज नमुना
- उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे/केसरी रेशन कार्ड
- अधिवास/रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर रेशन कार्ड/मतदार ओळखपत्र/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/जन्म दाखला या पैकी कोणतेही एक
Majhi Ladki Bahin Yojana form
शासनाने फॉर्म भरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. अर्जदार लाभार्थी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाईन सुविधा केंद्राद्वारे करू शकतात. किंवा अंगणवाडी केंद्रात, ग्रामपंचायत, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये येथे ऑफलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे एक समान असणार आहेत.
Thank you for ladki bhan yujna
Request my income magi
No maine
माझे कागज पत्र बरोबर आहे पण रिजेक्ट का झाला फॉर्म
कागदपत्रावरील माहिती व फॉर्म मध्ये भरलेली माहिती दोन्ही चेक करा.
Barobar
My form was approved but I didn’t get the money 😕
My form has been approved and my bank account is also seeding but still I have not received money ?
How to apply for maaji ladki bahen yojna
In my mother bank account there no rs had came.one message had sent by MAH – Your application no undefined for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
What’s meaning of this message?
Maza ladki bhahin cha form approved zalay pn ajun paise nahi aalet
aadhar card bank madhye link aahe ka check kara
Ho
Last kadi ahe mi ajun form bharla nahi
15 oct 2024
New form submit karu shakto ka
aata navin form band aahet, suru zalyanantr mahiti dili jail
Kadhi pasun suru honar?
Mala pahile payment 4500 rupees 9 Oct la milale. Tyanantar kahich payment aale nahi.. Ase ka?
फॉर्म कधी भरला होता.
माझा फ्रॉम pending dhakavat aahe
wat paha hoil approved