विवाह नोंदणी माहिती मोफत अर्ज डाऊनलोड करा : Marriage certificate maharashtra

marriage certificate documents

Marriage certificate maharashtra : नमस्कार मित्रहो, विवाह झाल्यानंतर आपण विवाह नोंदणी करणे गरजेचे आहे. विवाह नोंदणी आपण ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

आपण जर विवाह नोंदणी केली नाही तर विविध ठिकाणी तुम्हाला अडचणी येऊ शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला विवाह नोंदणी “Marriage certificate maharashtra” बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.(ग्रामपंचायत योजनांची यादी पहा)

Marriage certificate maharashtra

विवाह नोंदणीचे फायदे?, विवाह नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे तसेच विवाह नोंदणीसाठी लागणारा अर्ज/फॉर्म इ. तसेच आवश्यक असणारी कागदपत्रे याची संपूर्ण सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे.

लग्न झाल्यानंतर मुलीचे कागदपत्रावरील नावामध्ये बदल करावे लागतात. नावामध्ये बदल करण्यासाठी विवाहाचे प्रमाणपत्र (लग्नाचा दाखला) लागते. विवाहाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अर्ज करावा लागतो. त्यानंतरच प्रमाणपत्र दिले जाते.

ग्रामीण भागात विवाह नोंदणी आपण ग्रामपंचायत कडे करू शकता. विवाह नोंदणी नोंदणी हि विवाह झाल्यानंतर ९० दिवसाच्या आत करावी. ९० दिवसानंतर ही विवाह नोंदणी करू शकता परंतु फी/शुल्क मध्ये वाढ होऊ शकते.

Apply For Marriage Certificate | विवाह नोंदणी का करावी

  • विवाह झाल्यानंतर कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी आपण विवाह नोंदणी करणे गरजेचे आहे.
  • आपण विवाह नोंदणी केल्यानंतर विवाह प्रमाणपत्र मिळते. हे प्रमाणपत्र शासकीय कामात महत्वाचा दस्तावेज ठरतो.
  • विवाह झाल्यानंतर पत्नीचे आधार कार्डवरील नाव तसेच मतदान कार्डवरील नाव इ. ठिकाणी विवाह नंतरचे नाव बदलण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक असते.
  • विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी काही वेळेस विवाहाचे प्रमाणपत्र (लग्नाचा दाखला) लागतो.
  • विवाह नोंदणी करणे अनिवार्य आहे, विवाह नोंदणी करणे गरजेचे आहे.

Marriage Certificate Documents | विवाह नोंदणी कागदपत्रे.

अ.क्र.कागदपत्रे
१)विवाह नोंदणी फॉर्म (विवाहाचे ज्ञापन नमुना-ड)
२)वयाचा पुरावा (जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला)
३)वधू-वर प्रत्येकी पासपोर्ट ५ फोटो
४)वधू-वर ओळखपत्राचा पुरावा ( आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स)
५)प्रतिज्ञापत्र (१०० रु. स्टॅम्प पेपरवर)
६)विवाह निमंत्रण पत्रिका
७)विवाहातील ४X6 साईज फोटो
८)तीन साक्षीदार – आधार कार्ड, फोटो -२
९)रेशन कार्ड
marriage certificate documents
विवाह नोंदणी फॉर्म नमुना ड - येथे क्लिक करा.

यालेखात विवाह नोंदणी कागदपत्रे, विवाह नोंदणी online, विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत pdf, विवाह नोंदणी अर्ज नमुना इ. माहिती दिलेली आहे. तसेच विवाह नोंदणी ऑनलाईन कशी करावी माहितीसाठी- येथे क्लिक करा.

Marriage Certificate Apply

  • विवाह नोंदणी (विवाह ज्ञापन) फॉर्म नमुना ड माहिती भरणे.
  • विवाह नोंदणीचे ज्ञापन पत्नी ज्या विवाह निबंधकाचे कार्यक्षेत्रात राहत असतील त्या निबंधकासमोर सदर करणे.
  • तसेच विवाह ज्ञापानातील पक्षकार (वधू-वर) व ३ साक्षीदार व्यति स्वतः विवाह निबंधकासमोर उपस्थित राहून विवाह ज्ञापानावर स्वाक्षरी करणे.
विवाह नोंदणी कशी करावी?

आपण ग्रामपंचायत मध्ये विवाह नोंदणी करू शकता. नोंदणी करण्यासाठी आपल्याला विवाह विहित नमुन्यातील अर्ज भरून, तसेच आवश्यक कागदपत्रे जोडून द्यावी लागतील.

विवाह प्रमाणपत्राची प्रक्रिया काय आहे?

सर्व प्रथम विहित नमुन्यातील अर्ज अर्ज भरावा लागेल. वरील यादी मधील कागदपत्रे फॉर्मला जोडावी. विवाह नोंदणी कार्यालयामध्ये फॉर्म जमा करावा. या लेखात आपण विवाह नोंदणी फॉर्म दिलेला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *