CSC मध्ये डाक मित्र रजिस्ट्रेशन सुरु
नमस्कार मित्रांनो,आपण जर एक कॉमन सर्व्हिस सेंटर/CSC चालक असाल तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे.
CSC मध्ये एक नवीन सेवा आलेली आहे. तर हि नवीन सेवा कोणती आणि याचा केंद्र चालकाला कसा फायदा होणार यासाठी हा लेख सविस्तर वाचा.
CSC/Digital Seva Portal मध्ये डाक मित्र पोर्टल Launch केलेले आहे. यामध्ये CSC केंद्र चालक पार्सल पाठवू शकतात तसेच स्पीड पोस्ट सुद्धा करू शकतात.
पार्सल बुकिंग असो किंवा पाठवायचे याची संपूर्ण माहिती पोर्टल वरती पाहायला मिळेल. यामध्ये प्रत्येक VLE या सेवेचा लाभ घेऊ शकता.यासाठी नवीन रजिस्ट्रेशन सुरु झाले आहेत.
CSC डाक मित्र होण्यासाठी काय करावे.
- सर्वात प्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृत साईट : https://dakmitra.csccloud.in/
- या साईट वरती आल्यानंतर प्रथम Continue Wth Connect वरती क्लिक करून आपला CSC ID टाकून लॉग इन करा.
- लॉग इन केल्यानंतर नवीन एक फॉर्म पाहायला मिळेल.
- या फॉर्म मध्ये तुम्हाला फक्त आपला पिन कोड आणि Facility Description हे निवडण्यासाठी पर्याय दिसेल.
- माहिती भरल्यानंतर Proceed करा,आपल्या समोर DOP ID हा आपल्या CSC ID शी लिंक होईल.
- अशा प्रकारे आपले रजिस्ट्रेशन होईल.
कॉमन सर्व्हिस सेंटर कमिशन चार्ट.
अ.क्र. | बुकिंग रक्कम | Total Commission To CSC Channel (in%age) | Total Commission To CSC Channel (in Rs) | VLE CCommission (80% of CSC Commission Excluding TDS&GST) in Rs |
१ | २०० | १५ | ३० | २२.८ |
२ | ४०० | १५ | ६० | ४५.६ |
३ | ६०० | १५ | ९० | ६८.४ |