घरबसल्या फेरफार नोंदवा | महसूल खात्याच्या ९ सेवा ऑनलाईन सुरु

e hakka pranali e mutation maharashtra

e hakka pranali | e mutation maharashtra : नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी महत्वाची अपडेट शेतकऱ्यांना शेतीच्या महसूल खात्याकडील या नऊ सेवांचा लाभ घरबसल्या मिळणार.

e hakka pranali

शेतकऱ्यांना इकरार नोंदी, तसेच इतर कामासाठी तलाठी कार्यालय जावे लागत होते. परंतु आता शेतकऱ्यांना महसूल खात्याकडून दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्याला बऱ्याचशा सुविधा ह्या ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.(७/१२ वरती नोंद होण्यापूर्वी जाणून घ्या सर्व व्यवहाराचे फेरफार)

या सुविधांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यासाठी इ-हक्क/e-hakka प्रणाली (PDE-Public Data Entry) सुरु करण्यात आली आहे. यामुळे तलाठी कार्यालयात “e hakka pranali pune” वारंवार चकरा माराव्या लागणार नाही, घरबसल्या कामे होणार.

शेतकऱ्यांना कोणत्या सेवा ऑनलाईन मिळणार?

१)इ-करार नोंदी.
२)अपाक शेरा कमी करणे.
३)विश्वस्ताचे नाव बदलणे.
४)सात बारा चूक दुरुस्त करणे.
५)मृताचे नाव कमी करणे.
६)बोजा चढविणे,गहाणखत.
७)बोजा कमी करणे.
८)एकत्र कुटुंबकर्ता नोंद कमी करणे.
९)वारस नोंद करणे.
वेबसाईटhttps://pdeigr.maharashtra.gov.in/
e hakka pranali

वरीलप्रमाणे शेतकऱ्याला सुविधा इ-हक्क प्रणाली वरती मिळणार आहेत. या सर्व सेवा ऑनलाईन मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. आणि पैशाची सुद्धा बचत होणार आहे.

इ-फेरफार/e-hakk pranali वरील कार्यपद्धती कशी असेल?

शेतकऱ्यांना इ-हक्क (e hakka pranali) प्रणालीवरती प्रथम (PDE खाते) नोंदणी करावी लागेल. नंतर हवी असलेली सेवा निवडावी लागेल./ ज्या फेरफारसाठी अर्ज करायचा आहे. त्यामधून अर्जाचा प्रकार निवडा नंतर त्यासाठी लागणारी कागदपत्रे याची माहिती दिसेल.

त्यानंतर आवश्यक ती माहिती भरावी. तसेच आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची पडताळणी तलाठी करतील आपला अर्ज बरोबर असल्यास अर्ज मंजूर करण्यात येईल. त्यामध्ये काही त्रुटी असल्यास अर्ज परत पाठविला जाईल.“e hakka maharashtra”

अशा प्रकारे इ-हक्क प्रणाली वरील कार्यपद्धती असेल.

Similar Posts

2 Comments

  1. मला माझ्या गावचे जुने फेरफार दाखले हवे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *