घरबसल्या आधार कार्ड मतदान कार्डला लिंक करा | Aadhar Card Link Voter id

Aadhar Card Link Voter id

Aadhar Card Link Voter id : ज्या व्यक्तींचे मतदार यादी मध्ये नाव असेल त्यांनी मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

दिनांक १ ऑगस्ट 2022 पासून मतदार ओळखपत्रा सोबत आधार कार्ड जोडण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यासाठी नागरिकांना एक फॉर्म भरून द्यायचा आहे. हा फॉर्म ऑनलाईन वेबसाईट वरती भरायचा आहे.

Aadhar Card Link Voter id :

फॉर्म भरण्यासाठी मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड जवळ असणे आवश्यक आहे. आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर इतर कागदपत्राचा पर्याय दिलेला आहे.

मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी प्रथम National Voter’s Service Portal/राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल वरती नोंदणी करावी लागेल.

वेबसाईट वरती नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा. 

आधार कार्ड मतदान कार्ड लिंक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा | Aadhar Card Link Voter id

 • नोंदणी झाल्यानंतर आता तुम्हाला Log In/Register पेज वरती यायचं आहे.
 • लॉगिन करण्यासाठी Username :- मोबाईल नंबर आणि Password :- नोंदणी करताना टाकलेला पासवर्ड टाकून खालील कॅपच्या कोड भरा आणि लॉगिन वरती क्लिक करा.
 • आपण लॉगिन झाल्यानंतर आपल्यासमोर विविध पर्याय पाहायला मिळतील यामध्ये Information of Aadhar Number by existing electors हा पर्याय निवडा.
 • तुमच्यासमोर खालील प्रमाणे फॉर्म दिसतील.
  • प्रारूप 6/Form6
  • प्रारूप 6A/Form6A
  • प्रारूप 6B/Form6B
  • प्रारूप 7/Form 7
  • प्रारूप 8/Form 8
 • वरीलपैकी तुम्हाला प्रारूप6B/Form6B हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्मवर क्लिक करा.
 • आपल्यासमोर Form6B ओपन होईल. यामध्ये आपले नाव,आडनाव,मतदान ओळखपत्र क्रमांक इ. पाहायला मिळेल.
 • Form6B मध्ये मोबाईल नंबर टाका.
 • Aadhaar Details मध्ये तुमचा आधार नंबर टाकून घ्या.
 • Place मध्ये गावाचे नाव टाकू शकता.
 • CAPTCHA भरुन Preview बटनवर क्लिक करा.
 • आपण भरलेला Form6B पाहायला मिळेल. याची तुम्ही प्रिंट काढू शकता.
 • Submit बटण वर क्लिक करा.
 • आपला अर्ज आधार लिंक साठी योग्य रित्या भरला जाईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *