ferfar online maharashtra; असा काढा मोबाईलवरून फेरफार
ferfar online maharashtra : फेरफार हे जमिनी संदर्भातील महत्वाचे असे कागदपत्र आहे. शेतकऱ्यांना फेरफार काढण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये जावे लागत असे. फेरफार ferfar online maharashtra जर जास्त जुना असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयामध्ये जावे लागते. परंतु आता शेतकऱ्यांना जर जुने किंवा नवीन फेरफार काढायचे असतील ऑनलाईन काढता येतात.
ferfar online maharashtra
जुने किंवा नवे डिजिटल स्वाक्षरी सहित फेरफार मोबाईल वरून कसे काढायचे याची संपूर्ण माहिती येथे दिलेली आहे. फेरफार काढण्यासाठी आपल्याकडे फेरफार नंबर असणे गरजेचे आहे. आपल्याकडे जर फेरफार नंबर नसेल तर फेरफार नंबर हा ७/१२ वरती आपल्या नावासमोर पाहायला मिळेल.
फेरफार काढण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
फेरफार काढण्यासाठी पोर्टल वरती नोंदणी कशी करावी.
- फेरफार काढण्यासाठी तुम्हाला मोबाईल मध्ये https://digitalsatbara.mahabhumi.gov.in//DSLR हि साईट मोबाईल वरती ओपन करायची आहे.
- वेबसाईट क्रोम ब्रावझर मध्ये ओपन करावी व साईट Desktop मोड करून घ्यावी.
- साईट ओपन झाल्यानंतर त्याठिकाणी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी खालील प्रामाणे पर्याय दिसेल.
- Regular Login हा ऑप्शन निवडला तर तुम्हाला New User Registration म्हणजेच नवीन वापरकर्ता नोंदणी करावी लागेल.
- परंतु आपण OTP Base Login हा पर्याय निवडू शकता. यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल. आणि Send OTP वरती क्लिक करावे लागेल. मोबाईल नंबर वरती आलेला सहा अंकी OTP टाकून Verify OTP बटन वरती क्लिक करा.
- आपण पोर्टल वरती यशस्वीरीत्या लॉगइन व्हाल.
- फेरफार काढण्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागते. त्यासाठी रिचार्ज करावा लागेल.
- रिचार्ज करण्यासाठी Recharge Account हा पर्याय निवडावा. आपण युपीआय, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड द्वारे रिचार्ज करू शकता.
फेरफार कसा काढायचा?
- रिचार्ज केल्यानंतर पोर्टल वरती लॉग इन करा.
- खालील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे “Digital Sign Ferfar” हा पर्याय निवडायचा आहे.
- तुम्हाला जिल्हा, तालुका, गाव निवडायचे आहे नंतर फेरफार नंबर भरा समोरील चौकोनात फेरफार नंबर टाका आणि Down+load बटन वरती क्लिक करा. फेरफार मोबाईल मध्ये डाऊनलोड होईल. “ferfar online maharashtra”