गुगल पे, फोन पे वापरत असाल तर नक्की पहा : Google Pay ,Phone Pe

Google Pay ,Phone Pe

Google Pay ,Phone Pe : या डिजिटल युगात अनेक सेवा ह्या ऑनलाईन होत आहेत. यामुळे नागरिकांना सहज कामे उपलब्ध होत आहेत. कोणतीही माहिती हवी असल्यास काही मिनिटामध्ये गुगल वरती मिळते. बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर डिजिटलायझेशन होत आहे.

Google Pay, Phone Pe

गुगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून आपण लाईटबिल, मोबाईल रिचार्ज, टीव्ही रिचार्ज, fastag recharge, गॅस बुकिंग, loan emi payment, इन्शुरन्स पॉलिसी (insurance policy), लाईफ इन्शुरन्स (life insurance) अशा अनेक सेवांचा लाभ घेऊ शकतो. यामुळे वेळेची बचत होत आहे. मोबाईलवरूनच आपल्या बँक खात्यातील शिल्लक चेक करता येते. गुगल पे च्या माध्यमातून कर्ज “personal loan” देखील मिळते.

रिचार्ज व इतर पेमेंट वरती कॅशबॅक/बक्षिसे सुद्धा मिळतात. आपण पेमेंट करित असताना काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. कारण आपल्या एका चुकीमुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे याचा वापर करीत खालील टिप्स लक्षात घ्या.

फोन पे गुगल पे वापरताना कोणती काळजी घ्यावी?

  • मित्रांनो आपला मोबाईल कोणत्याही व्यक्तीला देऊ नका.
  • बँकेमध्ये जो मोबाईल नंबर लिंक असेल ते सिम मोबाईलमध्येच ठेवा, मोबाईल मधून काढू नका तसे केल्यास गुगल पे/फोन पे मोबाईल मध्ये चालणार नाही आणि कोणतेच पेमेंट/रिचार्ज होणार नाही.
  • गुगल पे/फोन पे ला पिन संरक्षण ठेवा. हा पिन कोणाला सांगू नका.
  • आपला युपीआय आयडी कोणालाही सांगू नका.
  • इतर अनोळखी व्यक्तीकडून आपल्या गूगल पे/फोन पे वरती पेमेंट घेऊ नका.
  • कर्ज घेण्यासाठी येणारे फोन/मेसेज या कडे दुर्लक्ष करावे.
  • कोणतीही बँक तुम्हाला के वाय सी करण्यासाठी फोन करीत नाही, म्हणून असा फोन आल्यास आपली कोणतीही माहिती त्यांना देऊ नका.

डिजिटल लोन (Loan) घ्यावे का?

  • मित्रांनो डिजिटल लोन, “Instant personal loan“, ५ मिनिटात लोन असे कर्ज घेणे शक्यतो टाळावे.
  • अधिकृत बँकेकडूनच कर्ज घेतलेले केंव्हाहि चांगले.
  • जर तुम्हाला ऑनलाईन कर्ज घ्यायचे असल्यास आधी त्याची संपूर्ण माहिती काढावी नंतरच कर्ज घेण्याचा विचार करावा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *