पीएम उज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू; PM Ujjwala Yojana
PM Ujjwala Yojana 2.0 : देशातील प्रत्येक कुटुंबासाठी आनंदाची बातमी सर्वसामान्य कुटुंबासाठी सरकारची भेट, प्रत्येक कुटुंबांना मिळणार नवीन LPG गॅस, सरकारची मोठी घोषणा, कोट्यवधी कुटुंबांना मिळणार प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ.
PM Ujjwala Yojana
प्रधानमंत्री उज्वला योजना २.० अंतर्गत नवीन गॅस कनेक्शन अर्ज सुरू झाले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण अर्ज कुठे करायचा तसेच त्यासाठी किती सबसिडी मिळणार, पात्रता आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे इ. माहिती आपण या लेखामध्ये सविस्तर पाहणार आहोत.
योजना | प्रधानमंत्री उज्वला योजना २.० |
लाभार्थी | महिला |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.pmuy.gov.in/ |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
प्रधानमंत्री उज्वला योजनेमुळे “PM Ujjwala Yojana” प्रत्येक कुटुंबांतील महिलांना दिलासा मिळणार आहे. या योजनेचा ७५ लाख महिलांना लाभ मिळणार आहे. यामुळे सामान्य कुटुंबांना पीएम उज्वला योजनेचा लाभ घेता येणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितली आहे. या योजनेसाठी फक्त महिला अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कॅटेगरीतील/प्रवर्गातील महिला अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे व माहिती (PM Ujjwala Yojana Documents)
- आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे)
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- रहीवाशी दाखला
- अर्जदाराचे वय १८ पूर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे आधार कार्ड तसेच कुटुंबातील व्यक्तींचे आधार दस्तऐवज इ.
लाभ घेण्यासाठी पात्रता निकष (Ujjwala Yojana Eligibility Criteria)
- कुटुंबातील महिला (वय १८ वर्षे पूर्ण) योजनेसाठी अर्ज करू शकते.
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे कोणतेही LPG गॅस कनेक्शन नसावे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट दया.
या योजनेचा अर्ज “Apply for New Ujjwala 2.0 Connection” हा आपण CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) मध्ये जावून करू शकता किंवा घरबसल्या उज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करता येईल. https://www.pmuy.gov.in/ या साईट वरून आपण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.