मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत झाले मोठे 7 बदल पहा : Majhi ladki bahin Yojana New update

Majhi ladki bahin Yojana New update

Majhi ladki bahin Yojana New update : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना १ जुलै २०२४ पासून महाराष्ट्र राज्यात सुरु झाली असून, योजनेमध्ये विविध बदल करण्यात आले आहेत लाभार्थीना आता अर्ज भरण्यासाठी जास्त धावपळ करण्याची गरज नाही. अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे त्याच बरोबर इतर काही बदल योजनेमध्ये करण्यात आले आहेत. लाभार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पर्यायाद्वारे अर्ज करू शकतात.

Mazi ladki bahin Yojana New update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत, योजनेमधील अर्ज करण्याची मुदत तसेच कागदपत्रे, पात्रता यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता लाभार्थी महिलांना अर्ज करण्यासाठी जास्त धावपळ करावी लागणार नाही. योजनेमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आले आहे.

 1. अर्ज करण्याची अंतिम मुदत हि १५ जुलै २०२४ होती, आता यामध्ये बदल करण्यात आला असून अर्ज करण्याची अंतिम मुदत हि ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत असणार आहे.
 2. अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना १ जुलै २०२४ पासून १५०० रुपये दर महिन्याला मिळणार आहेत.
 3. लाभार्थ्याकडे डोमासाईल प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी १५ वर्षापूर्वीचे १) रेशन कार्ड २) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३) जन्म दाखला ४) मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्रे आवश्यक असेल.
 4. लाभार्थीकडे केसरी/पिवळे रेशन कार्ड असेल तर उत्पन दाखला दाखल्याची आवश्यकता नाही.
 5. वयोगटाच्या अटी मध्ये बदल करण्यात आला असून आता २१ ते ६५ या वयोगटातील पात्र महिला योजनेसाठी अर्ज करू शकतात.
 6. कुटुंबातील एका अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
 7. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये हे मोठे बदल करण्यात आले असून लाभार्थींसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

अर्ज करण्यासाठी लाभार्थीकडे खालील कागदपत्रे आवश्यक

 • लाभार्थ्याचे आधार कार्ड
 • बँक पासबुक
 • रेशन कार्ड
 • १ पासपोर्ट आकाराचा फोटो
 • अर्जाचा नमुना
 • पिवळे/केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन दाखला आवश्यक नाही.
 • डोमासाईल प्रमाणपत्र नसेल तर १५ वर्ष पूर्वीचे रेशन कार्ड, ओळखपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (यापैकी १)
माहिती/अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *