लाडकी बहिण योजना अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ शेवटची संधी
महिलांसाठी आनंदाची बातमी आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरता येणार, अर्ज न भरलेल्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. यामुळे राज्यातील महिलांना अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.
राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली असून, योजनेमध्ये पात्र असणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे (१५०० रु) रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत. अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु यामध्ये पुन्हा एकदा मुदतवाढ करण्यात आली असून महिलांना १५ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत योजनेसाठी अर्ज भरता येणार आहे. परंतु यामध्ये सरकारने एक मोठा बदल केलेला आहे, म्हणजेच महिलांना आता मोबाईल वरून स्वतः अर्ज भरता येणार नाही तसेच, ऑनलाईन सुविधा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र/महा ई सेवा केंद्र याठिकाणी सुद्धा अर्ज भरता येणार नाही.
ज्या महिलांना योजनेसाठी अर्ज करायचा आहे, त्यांना अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज करावा लागेल. सरकारने हा मोठा बदल केलेला आहे. यामुळे महिलांना अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करण्यासाठी दि. 15/10/2024 पर्यंतच अर्ज भरता येणार आहे. यामुळे महिलांनी विहित कालावधीमध्ये अर्ज भरणे आवश्यक आहे. लाडकी बहिण योजनेचे हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.