पिक पाहणी करण्यासाठी मिळाली मुदतवाढ शेवटची तारीख पहा e pik pahani last date
शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता राज्यात १ ऑगस्ट पासून e pik pahani करण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या शेतात पेरणी केलेल्या पिकाची शेतकऱ्यांनी ई पिक पहाणी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्याने पेरणी केलेल्या पिकाची माहिती शासनाला देण्यासाठी मागील चार वर्षापासून राज्यात e pik pahani ची प्रणाली सुरु केलेली आहे. यालेखात आम्ही e pik pahani kashi karaychi याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
ई पीक पहाणी नोंदणी 2024 काय आहे?
शेतकऱ्यांना शेतातील पिकाची नोंद हि सहज व सोप्या पद्धतीने शेतामधूनच करता यावी यासाठी ई पीक पहाणी प्रणाली सुरु केली आहे. शेतकरी आपल्या शेतातील पिकाची माहिती हि ७/१२ उताऱ्यावर करणे आवश्यक आहे. ७/१२ उतारा वरती पेरणी केलेल्या पिकाची नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच याचा उपयोग होणार आहे. शेतकऱ्यांना पिक कर्ज काढण्यासाठी ७/१२ उताऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक असते. अन्यथा पिक कर्ज मिळण्यास अडचण येते. त्याच बरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ७/१२ उताऱ्यावर नोंद असावी लागते.
ई पिक पहाणी करणे म्हणजेच शेतातील पिकाची नोंद करणे होय. त्याच बरोबर शेतकऱ्यांना शेतातील झाडांची, पिकाची, विहीर, बोअरवेल, शेततळे, वहीत पड, कायम पड अशा ७/१२ संबधित विविध नोंदी शेतकरी मोबाईल अँप मधून करू शकतात.
राज्यात १ ऑगस्ट पासून ई पिक पहाणी सुरु झालेली आहे. पिक पहाणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्लेस्टोर वरून e pik pahani app अपडेट करून घ्यावे. अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिक विमा भरलेला आहे. नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर नोंद केलेली असेल तर शेतकऱ्याला संबधित विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकते. यासाठी शेतकऱ्याने ई पिक पहाणी करणे गरजेचे आहे.
ई पीक पहाणी नोंदणी कशी करावी?
e pik pahani kashi karavi नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याने ज्या गटामधील पिकाची नोंद करायची आहे त्या गटामध्ये जावून नोंद करावी लागणार आहे. म्हणजेच शेतकरी नोंद करीत असताना त्या गटामध्ये जावून नोंद करावी लागेल. शेतकऱ्यांसाठी ई पिक पहाणी करण्यासाठी शासनाने दोन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहे.
- शेतकरी स्वतः मोबाईल वरून ई पिक पहाणी अँप मध्ये नोंदणी करून पिक पहाणी करू शकतात.
- ई पिक पहाणी सहाय्यक यांच्याद्वारे सुद्धा पिक पहाणी शेतकरी करू शकतात.
- शेतकऱ्यांनी पिक पहाणी करण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल मध्ये ई पिक पहाणी अँप e peek pahani app डाऊनलोड करून घ्यावे.
- त्यानंतर आपण जर यापूर्वी कधी ई पिक पहाणी अँप मध्ये नोंदणी केली नसेल तर सर्वप्रथम नोंदणी/रजिस्ट्रेशन करावी लागेल.
- नोंदणी झाल्यानंतर अँपमध्ये लॉगइन करून शेतकरी पिक पहाणी करू शकतात.
E pik pahani Last Date
शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील ई पिक पहाणी करण्यासाठी 1 ऑगस्ट 2024 पासून शासनाने खरीप हंगामातील पिक पहाणी नोंदणी सुरु केली आहे. पिक पहाणी करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. तसेच संपूर्ण वर्षातील पिकाची नोंद करायची असल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षामध्ये कधीही नोंद करता येणार आहे. परंतु खरीप हंगामातील 2024 मधील ई पिक पहाणी करण्यासाठी (e pik pahani last date 2024) 15 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता हि मुदत वाढविण्यात आली असून शेतकऱ्यांना २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत ई पिक पहाणी करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना वाढीव ७ दिवसाची मुदत मिळाली आहे.