Ration Card list 2026 : आपल्या गावाची नवीन रेशन कार्ड यादी अशी पहा मोबाईलवर
Ration Card list 2026 : महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. आपल्या गावातील रेशन कार्ड यादी आता ऑनलाइन पाहता येते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या RCMS वेबसाइटचा वापर करता येतो.
Ration Card Maharashtra
एखाद्या योजनेचा फॉर्म भरायचा असल्यास रेशन कार्ड मागितले जाते. अशा वेळी आपण रेशन कार्ड झेरोक्स देत असे. परंतु या डिजिटल काळात आपल्या रेशन कार्ड वरती १२ अंकी नंबर म्हणजेच आपले रेशन कार्ड हे ऑनलाईन असणे गरजेचे आहे. काही रेशन कार्ड धारकांच्या कार्ड वरती १२ अंकी नंबर नसतो. हा नंबर नसेल तर त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच त्यांना रेशन कार्ड असून देखील धान्य मिळत नाही.
यामुळे आपले रेशन कार्ड हे ऑनलाईन असणे गरजेचे आहे. आपण आपल्या गावच्या रेशन कार्ड यादीमध्ये आपले नाव चेक करू शकता. तसेच त्या यादीमध्ये रेशन कार्डचा १२ अंकी (src number in ration card maharashtra) नंबर सुद्धा पाहता येणार आहे. यामुळे जर आपल्या रेशन कार्ड वरती १२ अंकी नंबर नसेल तर आपण यादी मध्ये आपला नंबर शोधू शकता.
Ration Card SRC Number Search Maharashtra
रेशन कार्डचा SRC नंबर आपण यादीमध्ये सुद्धा चेक करता येईल तसेच आपण आधार कार्ड नंबर वरून आपल्या रेशन कार्डचा १२ अंकी SRC नंबर शोधू शकता.
