आपल्या गावची रेशन कार्ड यादी पहा : Ration Card list Maharashtra
Ration Card list Maharashtra : आपण याआधी रेशन कार्ड यादी संदर्भात इतर वेबसाईट वरती खूप पोस्ट/लेख वाचले असतील, पण तुम्हाला यादी खरी माहिती मिळाली नसेल परंतु याठिकाणी आम्ही तुम्हाला अचूक/खरी माहिती देणार आहे.
Ration Card list Maharashtra
आपल्या गावाची रेशन कार्ड यादी पाहण्यासाठी तुम्हाला मोबाईल वरून पाहता येणार आहे. आपण मोबाईल वरून यादी पहायची यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.(ग्रामपंचायतचे सर्व दाखले पहा मोबाईलवरून)
- मोबाईल मध्ये https://rcms.mahafood.gov.in/show_reports.aspx?RID=98 हि साईट ओपन करा.
- वेबसाईट ओपन झाल्यानंतर प्रथम तुम्हाला CAPTCHA टाका आणि Verify बटन वर क्लिक करा.
- खालील प्रमाणे पेज ओपन होईल.
- State/राज्य – Maharashtra.
- District/जिल्हा – आपला जिल्हा निवडा.
- DFSO – District Food Supply Office
- Scheme – Select All पर्याय निवडू शकता.(ग्रामपंचायत योजना यादी पहा)
- दिनांक/वेळ आणि Report Name स्वयंचलित निवडले जाईल.
- View Report वरती क्लिक करा.
- COLLECTOR OFFICE (BRANCH SUPPLY) यावर क्लिक करा.
- खालील प्रमाणे तहसील ऑफिस ची यादी पाहायला मिळेल.
- आपल्या तहसील/तालुका वरती क्लिक करा.
- पुन्हा तुमच्यासमोर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य वाटप दुकानांची यादी पाहायला मिळेल.
- त्यामध्ये आपले गावाचे नाव/गावातील स्वस्त धान्य दुकानाचे नाव चेक करा. आणि त्यावरती क्लिक करा.
- आपल्या समोर संपूर्ण गावाची रेशन कार्ड यादी ओपन होईल.
- यादी मोबाईल मध्ये घेण्यासाठी खाली दाखवल्याप्रमाणे Save बटन वर क्लिक करून यादी EXPORT करा.