ग्रामपंचायतचे सर्व दाखले पहा मोबाईलवर : Gram Panchayat Certificate

mahaegram citizen connect.

Gram Panchayat Certificate : ग्रामपंचायत कडून दिले जाणार दाखले आता, आपल्याला मोबाईल वरती “mahaegram” पाहता येणार आहे.

Gram Panchayat Certificate Online

ग्रामपंचायत कडून विवध दाखले उतारे नागरिकांना दिले जातात. पण एखाद्या व्यक्तीला जर दाखला किंवा उतारा काढायचा असल्यास त्यासाठी त्याला ग्राम पंचायत मध्ये जावे लागत असे.परंतु आता नागरिकांना ग्रामपंचायत मधील बऱ्याच सुविधा ह्या मोबाईल वरती उपलब्ध करून दिल्या जात आहे.

ग्रामपंचायतच्या खालील सुविधा मिळणार मोबाईलवर

मोबाईल वरती मृत्यू दाखला,जन्म दाखला, घरपट्टी, पाणीपट्टी, विवाह नोंदणी दाखला, जागेचा घराचा उतारा, ग्रामपंचायत पदाधिकारी माहिती, इ. सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिलेल्या आहेत. नागरिक कधीही मोबाईलवरून या सुविधाचा लाभ घेऊ शकतात.

maha egram citizen connect
maha egram citizen connect

दाखले मोबाईलवरती पाहण्यासाठी प्ले-स्टोर वरती mahaegram citizen connect हे App उपलब्ध करून दिले आहे. नागरिकांनी ते प्ले-स्टोर वरून घ्यावे.

त्यामध्ये सर्व प्रथम नवीन नोंदणी करावी लागणार आहे. नंतरच पुढील सुविधांचा लाभ घेता येणार आहे. तसेच वरील सुविधा काही जिल्ह्यामध्ये सुरु आहेत. अजून सर्व जिल्ह्यामध्ये सेवा सुरु नाही. परंतु लवकरच “maha egram citizen connect” यावरती सर्व जिल्ह्याच्या सुविधा लवकरच उपलब्ध होतील.

हे पण वाचा »  ग्राम पंचायत योजना लिस्ट (Gram Panchayat Yojana List)

Related Posts...

One Comment

Leave a Reply