Pik Vima Date Extended 2026 : खरीप पीकविमा 2026 अर्जाची मुदत 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवली
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून खरीप पीकविमा (प्रधानमंत्री पीक विमा योजना – PMFBY) 2026 अंतर्गत अर्ज भरण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा अर्ज अद्याप भरायचा राहिला आहे, त्यांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन तात्काळ अर्ज करावा. राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी केल्यानंतर ही वाढ Pik Vima Date Extended 2026 करण्यात आली आहे.
पीकविमा योजनेचे महत्त्व
प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट, वादळ तसेच कीड व रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे नुकसान झाल्यास पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास मदत होते.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ व ८-अ उतारा
- आधारशी संलग्न बँक खाते पासबुक
- अॅग्रीस्टॅक (Farmer ID) नोंदणी
- ई-पीक पाहणी / डिजिटल क्रॉप सर्व्हे पूर्ण केलेला असावा
- पिकाची माहिती व आवश्यक स्वयंघोषणापत्र (लागू असल्यास)
- सामाईक क्षेत्र असल्यास संमती पत्र
अर्ज कुठे करावा?
शेतकरी खालील माध्यमातून अर्ज करू शकतातः
- CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर)
- आपले सरकार सेवा केंद्र
- संबंधित बँक
- अधिकृत PMFBY पोर्टल – https://pmfby.gov.in/
अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी. तसेच ई-पीक पाहणी आणि पीकविमा अर्जातील पीकाची माहिती एकसारखी असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा दावा मंजूर होण्यात अडचणी येऊ शकतात.
Pik Vima Date Extended 2026
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीकविमा भरलेला नाही त्यांनी 10 ऑगस्ट 2026 पूर्वी अर्ज करून आपल्या पिकांचे संरक्षण सुनिश्चित करावे. शेवटच्या दिवशी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी अर्ज लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे.
