अग्निपथ योजना काय आहे? पहा सविस्तर माहिती | what is agneepath scheme

agneepath scheme details | अग्निपथ योजना काय आहे : अग्निपथ योजने अंतर्गत भारत सरकारने सुरक्षा दल वाढविण्यासाठी हि योजना आखली आहे. अग्निपथ योजना हि सशस्त्र दलांसाठी मानव संसाधन व्यवस्थापन योजना आहे. अग्निपथ योजने अंतर्गत जे उमेदवार समाविष्ट होतील अशा उमेदवारांना अग्निवीर म्हंटले जाईल. जे उमेदवार/अग्निवीर भारतीय वायुसेनेत दाखल होतील, त्यांची निवड वायुसेना कायदा १९५० अंतर्गत चार (४) वर्षासाठी केली जाईल. अग्निपथ योजना अंतर्गत अग्निविरांना विविध सोयी सुविधांचा लाभ मिळेल.(या जिल्ह्यासाठी महा ई सेवा केंद्रासाठी ऑनलाईन अर्ज सुरु)
अग्निपथ योजना | agneepath scheme details
अग्निपथ योजना माहिती : सर्व अग्निविराने नाव नोंदणी करण्याच्या प्रक्रीयेत अग्निपथ योजनेच्या असणाऱ्या सर्व अटी व शर्ती स्वीकारणे आवश्यक आहे. तसेच ज्या उमेदवारांचे वय १८ वर्षे पेक्षा कमी असेल अशा उमेदवारांसाठी सध्याच्या तरतुदी नुसार नाव नोंदणी अर्जावर पालक/पालकांनी सही/स्वाक्षरी करणे आवश्यक आहे.(ग्रामपंचायत विभाग योजनांची यादी)
अग्निवीर यांची ऑल इंडिया ऑल क्लास आधारवर नाव नोंदणी केली जाईल. तसेच पात्रतेसाठी त्यांचे वय वर्षे १७.५ ते २३ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. अग्निविरांना चार वर्षनंतर निवृत्त केले जाईल. परंतु त्यामधील २५% अग्निविरांना पुन्हा सेवेत घेतले जाणार आहे. त्यासाठी त्यांना आणखी ६ (सहा) महिन्यांचे स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाईल.
अ.क्र. | तपशील | – |
---|---|---|
१) | वयोमर्यादा | Agneepath Scheme Age Limit | १७.५ ते २३ दरम्यान |
२) | सेवेचा कालावधी | चार (४) वर्षे |
३) | चार वर्षानंतर | कामगिरीच्या आधारे मुल्यांकन केले जाईल. |
४) | लाभार्थी | तरुण वर्ग |
५) | स्तर | राष्ट्रीय स्तर |
६) | योजनेचे नाव | अग्निपथ योजना |
७) | अर्ज करण्याचा प्रकार | ऑनलाईन |
८) | अधिकृत संकेस्थळ | https://www.mod.gov.in |
भरती कधी सुरु होईल? | agneepath yojana registration
अग्निपथ योजने अंतर्गत पुढील ९० दिवसात म्हणजेच तीन महिन्यात भरती सुरु होईल.