जिल्हा परिषद योजना या जिल्ह्यातील ऑनलाईन अर्ज सुरु | zp yojana jalna jilha parishad

zp yojana jalna jilha parishad

zp yojana jalna jilha parishad : जिल्हा परिषद कडून मिरची कांडप साठी अर्ज सुरु झाले आहेत. ज्यांना मिरची कांडप घेयचे असेल, ते जिल्हा परिषदेकडे अर्ज करू शकतात. हा अर्ज करण्यासाठी जिल्ह्याच्या अधिकृत संकेत स्थळावर अर्जाची लिंक दिलेली आहे. त्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. तेथून अर्ज मोबाईल मध्ये घेऊन जवळील झेरॉक्स सेंटर वरती काढून अर्ज काढून कार्यालयात जमा करावा लागेल. जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती लाभार्थी महिलांना मिरची कांडप या घटकासाठी महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद जालना कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या लेखात तुम्हाला अर्जाची संपूर्ण माहिती दिलेली आहे.(घराचा जागेचा सिटी सर्व्हे उतारा काढा नावावरून)

अर्ज कसा करावा? | zp yojana jalna jilha parishad Form

प्रथम तुम्हाला जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरती विभाग व योजना या Tab मध्ये अर्जाची लिंक दिलेली असेल तसेच पी डी एफ दिलेली आहे. त्या लिंक वरून अर्ज करावा लागेल. अर्ज ऑनलाईन केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरील विभाग व योजना मध्ये अर्जाची पी डी एफ दिलेली आहे. ती पी डी एफ काढून झेरॉक्स सेंटर वरून प्रिंट काढून घ्यावी, व व्यवस्थित अर्ज भरून अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात जमा करावा.(ग्रामपंचायत विभाग योजनांची यादी)

योजनेसंदर्भात माहिती चा तक्ता | zp yojana jalna jilha parishad 2022

अ.क्रतपशील
१)कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज सुरु आहेत.जालना
२)अर्ज सुरु झाल्याची तारीख१३/०६/२०२२
३)अर्ज करण्याची अंतिम तारीख२२/०६/२०२२
४)जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळhttps://zpjalna.co.in/
५)अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा
६)ऑफलाईन अर्जाची लिंकयेथे क्लिक करा
७)जाहिरातयेथे क्लिक करा
zp yojana jalna jilha parishad

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे?

 • आधार कार्ड झेरॉक्स
 • आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते पासबुक झेरॉक्स
 • रहिवाशी दाखला (ग्रामसेवक किंवा तहसीलदार)
 • उत्पन्न दाखला (तलाठी किंवा तहसीलदार कडील)
 • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १२०००० रु पेक्षा जास्त नसल्या बाबत प्रमाणपत्र
 • दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असल्यास दाखला
 • अ.जा./अ.ज. प्रमाणपत्र
 • दिव्यांग असल्यास (सक्षम अधिकाऱ्याचे प्रमापत्र)

योजनेच्या अटी व शर्ती?

 • लाभार्थी निवडीचे संपूर्ण अधिकार महिला व बालकल्याण समितीस राहतील.
 • अपूर्ण किंवा नामंजूर प्रस्ताव बाबत पत्रकाद्वारे कळविण्याची जबाबदारी समितीवर राहणार नाही.
 • लाभार्थ्याचा मंजूर देय लाभाचे देयक ग्रामसेवक यांचे मार्फत सादर करणे बंधनकारक राहील.
महत्वाचे : अर्जदार बचत गटाचा असेल तर त्यास प्राधान्य देण्यात येईल. स्वंयसहाय्यता बचत गटाचे प्रमाणपत्र SHG NIC CODE सह

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *