पीएम किसान योजनेचे 14 व्या हप्त्याचे असे पहा स्टेटस : PM Kisan Beneficiary Status

PM Kisan Beneficiary Status

PM Kisan Beneficiary Status : नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे. १४ व्या हप्त्याचे स्टेटस मोबाईल वरून कसे चेक करायचे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

PM Kisan Beneficiary Status

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे स्टेटस चे करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. मोबाईलवरून अगदी काही मिनिटातच स्टेटस चेक करता येणार आहे. पीएम किसान योजनेच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना आधार कार्ड क्रमांक, बँक खाते नंबर आणि मोबाईलनंबरद्वारे स्टेटस चेक करता येत होते. परंतु आता शेतकऱ्यांना “pm kisan yojana” स्टेटस चेक करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या फक्त नोंदणी क्रमांकाद्वारे स्टेटस चेक करता येणार आहे.

PM Kisan – पीएम किसान योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर स्टेटस चेक करता येणार आहे. चेक करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार प्रमाणीकरण करताना दिलेला मोबाईल नंबर किंवा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

पीएम किसान योजना १४ व्या हप्त्याचे स्टेटस कसे चेक करावे?

 • सर्वप्रथम वरील (pmkisan) साईट मोबाईलवरती ओपन करा.
 • स्टेटस चेक करण्यासाठी वेबसाईट वरती Beneficiary Status हा पर्याय अपडेट करण्यात आला आहे.
 • Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे पर्याय दिसेल.
PM KISAN
PM KISAN
 • स्टेटस फक्त आपण नोंदणी क्रमांकद्वारे चेक करू शकतो. त्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा किंवा केवायसी करताना दिलेला मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.
 • नोंदणी क्रमांक (Registration No.) शोधण्यासाठी Know Your Registration No. या पर्यायावर क्लिक करावे.
pm kisan yojana (1)
pm kisan yojana
 • आपल्याकडे जर केवायसी करताना दिलेला मोबाईल नंबर असेल आपण Mobile Number हा पर्याय निवडावा.
 • आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर Aadhaar Number हा पर्याय निवडा व समोरील चोकोनात निवडलेल्या पर्यायनुसार क्रमांक टाकावा.
 • खालील चौकोनात Captcha कोड भरा आणि Get Mobile OTP वरती क्लिक करावे.
 • मोबाईल नंबरवरती मिळालेला ओटीपी टाकून Get Details वरती क्लिक करा.
 • त्याठिकाणी तुम्हाला नोंदणी क्रमांक दिसेल. उ.दा. MH1145–
 • नोंदणी क्रमांक लिहून ठेवावा.”PM Kisan Beneficiary Status
 • पुन्हा तुम्हाला पीएम किसान योजनेची साईट ओपन करून Beneficiary Status हा या पर्यायवरती क्लिक करायचे आहे.
 • त्याठिकाणी तुम्हाला मिळालेला नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. तसेच Captcha कोड टाकून Get OTP बटनवर क्लिक करावे. पुन्हा तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो टाकावा आणि Get Data वर क्लिक करा. तुम्हाला पीएम किसान योजनेचे स्टेटस पाहायला मिळेल.

अशा प्रकारे तुम्हाला पीएम किसान योजनेचे स्टेटस पाहायला मिळेल.

फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पुढील हप्ता

स्टेटस चेक केल्यानंतर स्टेटसमध्ये तुम्हाला तीन पर्याय दिसतील 1) PERSONAL INFORMATION 2) ELIGIBILITY STATUS 3) LATEST INSTALLMENT DETAILS हे तीन पर्याय दिसतील त्यामध्ये ELIGIBILITY STATUS या मध्ये तुम्हाला Land Seeding :- YesAadhar Sedding Status :- Yes आणि e-KYC Status :- Yes असे दाखवत असेल तर आपल्याला १४ वा हप्ता/पुढील हप्त्याचे २००० रु मिळतील.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *