येथून करा नवीन मतदार नोंदणी नवीन वेबसाईट सुरु पहा : Voter id Online Apply

Voter id Online Apply

Voter id Online Apply : मतदार नोंदणी, १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण आपले नाव मतदार यादीत समाविष्ट केले पाहिजे. म्हणजेच आपण “Voter id Online Apply” मतदार नोंदणी केली पाहिजे. मतदार नोंदणी कशी करायची व मतदान कार्ड कसे काढायचे, सविस्तर माहिती वाचा.

या लेखामध्ये काय आहे?

Voter id Online Apply

वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण मतदान करण्यासाठी सर्वप्रथम मतदार नोंदणी करणे गरजेचे आहे. आपण मोबाईलवरून काही मिनिटातच मतदान कार्ड साठी नोंदणी करू शकता. तेही घरबसल्या कुठेही न जाता.

मतदार नोंदणी करण्यासाठी आपले वय १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. नोंदणीसाठी अर्जदाराकडे ओळखीचा पुरावा, जन्म तारखेचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि स्वतः चा पासपोर्ट आकाराचा फोटो असणे गरजेचे आहे.

नवीन मतदार नोंदणी2024
जुने पोर्टलhttps://www.nvsp.in/
नवीन पोर्टलhttps://voters.eci.gov.in/
new voter registration

नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी शासनाने नवीन पोर्टल सुरु केले आहे. नागरिक नवीन पोर्टल वरती नवीन मतदार नोंदणी करू शकतात. तसेच मतदान कार्ड मधील नाव दुरुस्ती करणे, जन्म तारीख दुरुस्त करणे, फोटो बदलणे, मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करणे इ. कामे ऑनलाईन नवीन वेबसाईट वरती करता येणार आहे.

New Voter Registration Online In Maharashtra

नवीन मतदान नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. (new voter registration documents)

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

Voter Id Card Online Application Form

“नवीन मतदार नोंदणी कशी करावी” मतदार नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा. आपण वेबसाईट वरून किंवा अँप वरून दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. याठिकाणी आपण वेबसाईट वरून मतदान कार्डसाठी नोंदणी कशी करायची हे पाहणार आहोत.

नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी फॉर्म-६ (Form-6) हा भरावा लागतो, हा फॉर्म भरण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

 • सर्वप्रथम मोबाईल मध्ये वरील वेबसाईट https://voters.eci.gov.in/ ओपन करा.
 • वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्व प्रथम वेबसाईट वरती नोंदणी करावी नोंदणी करण्यासाठी Sign Up वर क्लिक करा.
new voter registration
new voter registration
 • त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकून Captcha Code भरा व Continue वरती क्लिक करा.
voter registration
voter registration
 • आपले नाव त्यानंतर आडनाव टाका व एक पास+वर्ड सेट करा आणि Request OTP वरती क्लिक करा.
 • दिलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी येईल तो टाका आणि व्हेरीफाय करून करा.
 • पोर्टल वरती आपली नोंदणी होईल. यानंतर Login या बटन वरती क्लिक करून लॉग इन करायचे आहे. त्यासाठी Login या बटन वरती क्लिक करावे.
 • आपला मोबाईल नंबर आणि पास+वर्ड टाकून लॉग इन करा.
voter id online login
voter id online login
 • Request OTP – पुन्हा मोबाईल वरती एक ओटीपी येईल तो टाकून व्हेरीफाय करा.
election card registration
election card registration
 • Fill Form 6 या बटन वरती क्लिक करा, फॉर्म ६ हा फॉर्म भरायचा आहे.
 • फॉर्म ६ ओपन होईल. सर्व प्रथम आपले राज्य, जिल्हा, तालुका, विधानसभा,मतदार संघ क्रमांक नाव निवडा.
 • Next वरती क्लिक करा, त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती भरावी, सोबत कागदपत्रे, फोटो अपलोड करा इतर माहिती अचूक भरून फॉर्म सबमिट करा. तुम्हाला एक Referance मिळेल, त्यावरून आपण अर्जाचे स्टेटस चेक करू शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *