प्रत्येक लाईट बिल मध्ये मिळवा 10 रुपये सवलत | Go Green Mahavitaran Yojana
Go Green Mahavitaran Yojana : नागरिकांसाठी आनंदाची बातमी आता प्रत्येक वीज बिल मध्ये १० रुपये सवलत/सुट मिळणार आहे. प्रत्येक वीज बिल मध्ये १० रुपये सवलत मिळविण्यासाठी नागरिकांना गो-ग्रीन योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.
Go Green Mahavitaran yojana
गो ग्रीन नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे लाईट बिल असणे आवश्यक आहे, गो ग्रीन नोंदणी केल्यानंतर प्रती महिन्याला मिळणारे लाईट बिल (हार्डकॉपी) तुम्हाला मिळणार नाही. म्हणजेच आपल्याला ई-मेल वरती वीज बिल मिळेल. आपण मोबाईल वरून ते बिल भरू शकता.
नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याचे बिल हे मोबाईल वरती मिळेल. नोंदणी झाल्यानंतर ई मेल वरती ई मेल व्हेरीफीकेशन साठी मेल येईल. (ग्रामपंचायत घरकुल यादी अशी पहा मोबाईलवर) गो ग्रीन साठी नोंदणी केल्यानंतर वीज बिल ग्राहकाला ई मेल व एसएमएस द्वारे बिल मिळेल. यामुळे वीज बिल ग्राहकाला प्रत्येक वीजबिलामध्ये १० रुपये सूट सवलत मिळणार आहे, म्हणजेच वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे.
गो ग्रीन साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी छापील वीज बिलावरती असणारा १५ अंकी GGN क्रमांक असणे आवश्यक आहे, गो ग्रीन नोंदणी झाल्यानंतर आपण ऑनलाईन विज बिल/ लाईट बिल भरू शकता.