हुमणी पासून उस पिकाचे संरक्षण कसे करावे

Sugarcane Crop Protection

Sugarcane Crop Protection : ऊस पिकाचे सरंक्षण कसे करावे?

ऊस पिकाची काळजी तसेच संरक्षण करणे गरजेचे आहे.या लेखात सविस्तर वाचा.

 • जमिनीतून होणा-या बुरशीजन्य रोगांपासून वाढणा-या कोवळ्या अंकुराचे व लहान रोपांचे संरक्षण करण्यासाठी कार्बेन्डॅझिम ०.१ टक्के (१० लिटर पाण्यात १० ग्रॅम) बेणे प्रक्रीये वेळी दयावे.
 • ऊस वाढीच्या (३ ते ७ महिने) काळात मान्सुनपुर्व पडलेला वळीव पाऊस व मान्सुनमुळे वाढलेल्या हवेतील आर्द्रतेमुळे पोक्का बाईंग हा रोग पानावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
 • शेंडा कूज रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर नियंत्रणासाठी १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १०-१५ दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या कराव्यात.
 • पानांवर हवेव्दारे प्रसारीत होणारा ऊस पिकावरील तांबेरा हा महत्वाचा रोग आहे.
 • त्याचे नियंत्रणासाठी ०.३ टक्के मॅन्कोझेब (३० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) अथवा ०.१ टक्के टेब्युकोनॅझोल (१० मिली प्रति १० लिटर पाणी) फवारावे.
 • गवताळ वाढ नियंत्रणासाठी दर ३ वर्षांनी शेतक-यांनी बेणे बदल केल्यास या रोगावर नियंत्रण मिळविता येते.
 • ऊसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास एकरी २ फुले ट्रायकोकार्डची १० ते १५ दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ ते ३ वेळा वापरावीत.
 • तसेच प्रभावी नियंत्रणासाठी क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के एस.सी. ३ ते ४ मि.ली. प्रति १० लि. पाण्यातून अथवा क्लोरोपायरीपाफस २० टक्के ई.सी. १२ ते १५ मि.ली. प्रति १० लि.. पाण्यातून फवारावे.
 • लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी जैविक उपाययोजना :– कोनोबाथा, मायक्रोमस, डिफा मित्र किटकांचे संवर्धन करावे.

हुमणी किडनियंत्रण :

शाश्वत पाणीपुरवठ्याच्या जमिनीत घेतल्या जाणा-या पिकांमध्ये ओलावा आणि अन्नपुरवठाजास्त होत असल्याने हुमणी अळाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीकडे दुर्लक्ष झाल्यास पिकाचे नुकसान होणार हे निश्चित आहे प्रामुख्याने हुमणीची अळी अवस्था पिकाचे नुकसान करतात अळी अवस्था पिकाची मुळे खातात त्यामुळे पिक वाळून जाते व जास्त प्रादुर्भाव झाल्यास शेतातील संपूर्ण पीकाचे नुकसान होते. वळवाचा पहिला पाऊस झाल्यानंतर सुप्तावस्थेत असलेले मुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, कडुनिंब, बोर, इ. झाडांवर गोळा होतात. नर व मादी भुंगेरांचे झाडांवर मिलन होते व सुर्योदयापूर्वी थोडावेळ आधी मुंगेरे परत जमिनीत जातात. त्यानंतर २ ते ३ दिवसात मादी भुंगेरे जमिनीत अंडी घालण्यास सुरूवात करते.

हुमणी अळीचा जीवनक्रम :

अंडी (९ ते १२ दिवस), अळी (६ ते ८ महिने), कोष (२० ते २५ दिवस ) भुगेरे (८० ते ९० दिवस) सर्वसाधारणपणे हुमणी अळीचा जीवनक्रम पूर्ण ते होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. हुमणीच्या जीवनक्रमात भुंगेरे हीच एक अवस्था थोडया कालावधीसाठी जमिनी बाहेर असते. उर्वरीत सर्व अवस्था जमिनीत • असतात. त्यामुळे भुंगेरे अवस्थेत किडीचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

हुमणी भुंगे-यांचा बंदोबस्त :

 • पीक काढणीनंतर लगेचच १५ ते २० से. मी. खोल नांगरट करावी. तसेच पक्षांना आकर्षीत करण्यासाठी लाहया तसेच इतर पक्षीखाद्य शेतात टाकावे.
 • आंतरमशागतीच्या वेळी अळया गोळा करून लोखंडी हुकाच्या सहाय्याने माराव्यात.
 • पिकास पाणी देताना ते जास्त काळ साचून राहील याकडे लक्ष द्यावे.
 • हुमणीग्रस्त शेतातील सुकलेली पिकांची रोपे उपटावीत व मुळाशेजारील आळयांचा नाश करावा.
 • कार्बोफ्यूरॉन ३ टक्के दाणेदार ३३ किलोग्रॅम प्रति हेक्टर किंवा फिप्रोनिल ४० टक्के व इमिडाक्लोप्रिड ४० टक्के प्रति ५०० ग्रॅम १२५० लि. पाण्यात मिसळून तोटी काढलेल्या पंपाने ऊस लागवडीच्या ओळीत पाण्यासोबत सोडावे.
 • जिवाणू बॅसीलस पॉपीली व सूत्रकृमी हेटरो हॅब्डेटीस हे हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *