गावातील किती शेतकऱ्यांनी पिक पाहणी केली पहा | e peek pahani list
e peek pahani list : नमस्कार शेतकरी बंधुनो आज आम्ही तुमच्यासाठी महत्वाची अपडेट घेऊन आलो आहोत.शेतकऱ्यांना पिक पाणी लावण्यासाठी तलाठी यांच्या कडे जायला लागत होते. यामध्ये शेतकऱ्यांचा खूप वेळ वाया जात होता परंतु शेतकऱ्यांना आता शेतीचे पिक पाणी हे ऑनलाईन मोबाईल वरून लावता येणार आहे.“e peek pahani list”
यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल शेतकरी शेतात गेल्यानंतर आपले पिक पाणी हे मोबाईल वरून लावू शकतात.बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतीचे पिक पाणी हे ऑनलाईन मोबाईल वरून नोंदवले आहे.आपल्या गावातील किती शेतकऱ्यांनी पिक पाणी ऑनलाईन केले आहे.
[ e peek pahani list ] पाहण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा.
- महाराष्ट्र शासनाचे अधिकृत epeek mahabhumi या संकेस्थळाला भेट द्या.
- अधिकृत संकेतस्थळ – https://epeek.mahabhumi.gov.in/misv2/
- आपण जर कॉम्पुटर वरून पाहत असल्यास इ-पिक पाहणीच्या अधिकृत संकेतस्थळावर आल्यानंतर डाव्या बाजूला view summery report हा पर्याय पाहायला मिळेल.
तसेच आपण नवीन ॲपमध्ये ज्या व्यक्तींनी पिक पाहणी केली आहे त्याची नावासहित यादी पाहता येणार आहे.
ॲपमध्ये यादी पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.
- मोबाईल वरून पहात असल्यास आपण Chrome मध्ये वरील वेबसाईट ओपन करा. आणि उजव्या बाजूला वरती तीन रेषा असतील त्यावरती क्लिक करा आणि Desktop हा पर्याय निवडा. म्हणजेच जशी कॉम्पुटर वरती वेबसाईट असते तशी तुम्हाला मोबाईल वरती पाहायला मिळेल.
अ.क्र. | तपशील | – |
१} | “e peek pahani” अधिकृत मुख्यसंकेतस्थळ | येथे क्लिक करा |
२} | e peek pahani Report संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
- यामध्ये डाव्या बाजूला view summery report हा पर्याय असेल त्यावरती क्लिक करा.
- आपल्या समोर Division दिसतील, आपल्या Division वरती क्लिक करा.
- आपल्या जिल्ह्या वरती क्लिक करा.
- तालुक्या वरती क्लिक करा. आपल्या गावावर क्लिक करा.
आपल्यासमोर गावातील किती शेतकऱ्यांनी पिक पाहणी केली. तसेच Active आणि InActive खातेदार याची आकडेवारी दिसेल.