PM kisan 12th Installment : या तारखेला मिळणार १२ वा हप्ता
PM kisan 12th Installment Date : पीएम किसान योजना लाभार्थी पडताळणी आणि आधार प्रमाणीकरण यामुळे शेतकऱ्यांना १२ वा हप्ता मिळण्यास उशीर झाला आहे.
PM kisan 12th Installment Date
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रु दिले जातात. शेतकऱ्यांना ११ व्या हप्त्याचे २००० रु. ३१ मे २०२२ ला बँक खात्यात मिळाले आहेत. पुढील १२ हप्ता शेतकऱ्यांना १७ ऑक्टोंबर २०२२ पासून पाठविण्यात येणार आहे. ज्या बँकेत आपले आधार कार्ड लिंक आहे त्याच बँकेत १२ वा हप्ता मिळणार आहे. (कोणत्या बँकेत आधार कार्ड लिंक आहे पहा)
पीएम किसान योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याने KYC (आधार प्रमाणीकरण) करणे बंधनकारक आहे. यामुळे आपण जर KYC केली नसेल, तर आजच आपली केवायसी करून घ्या यामुळे पुढील हप्ता मिळेल.(PM Kisan Yojana)
ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेची केवायसी केली आहे. अशाच शेतकऱ्यांना १२ वा हप्ता मिळणार आहे.