पुणे महानगरपालिका संचलित इंग्रजी माध्यमांच्या शाळांकरिता शिक्षक भरती सुरु
pune corporation school teacher recruitment : पुणे महानगरपालिका संचलित इंग्रजी माध्यमांच्या शाळेसाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ शिक्षक भरती.
PCM संचालित इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी सहा महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक पदासाठी भरती अर्ज सुरु झाले आहे.
प्राथमिक शिक्षक पदासाठी निवड हि शैक्षणिक व व्यवसायिक पात्रतेच्या मिळालेल्या गुणानुक्रमे करण्यात येणार आहे.
हि भरती प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन आहे.यामुळे आपल्याला अर्ज हा ऑफलाईन सादर करावा लागणार आहे.
शिक्षक पदासाठी पात्रता काय असेल?
शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राधान्यक्रमाने खालील प्रमाणे निश्चित केली जाईल.
१) | इ. १ ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण असणे आवश्यक आहे आणि डी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
२) | इ. १ ली ते १० वी पर्यंत मराठी अथवा इ. १२ वी इतर माध्यमातून आणि डी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
३) | इ. १ ली ते १० वी पर्यंत इंग्रजी इ. १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून आणि डी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
४) | इ. १ ली ते १० वी पर्यंत मराठी अथवा इतर माध्यमातून आणि डी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
५) | वरती नमूद केलेला सर्व उमेदवाराला (टीइटी) शिक्षक पात्रता परीक्षा उतीर्ण आवश्यक/बंधनकारक आहे. |
मानधन किती असेल?
दरमहा एकवट रक्कम रु.१५००० (पंधरा हजार रुपये फक्त)
कार्यकाळ किती असेल?
सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी | करारपद्धतींवर
शिक्षक पदासाठी एकूण जागा?
एकूण पदांची संख्या : २१४
अ.जा. | अ.ज. | वि.जा.अ | भ.ज.ब | भ.ज.क. | भ.ज.ड. | वि.मा.प्र. | इ.मा.व. | EWS | खुला | एकूण |
२८ | १५ | ६ | ५ | ८ | ४ | ४ | ४१ | २१ | ८२ | २१४ |
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?
अ.क्र. | गुणपत्रके/प्रमाणपत्र |
१) | S.S.C |
२) | H.S.C |
३) | D.ed |
४) | TET |
५) | अभियोग्यता |
६) | MS-CIT |
७ | पदवी |
अर्ज करण्याचा कालावधी
जाहिरात प्रसिद्ध दिनांकापासून ७ दिवसा पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११ ते २ यावेळेत खालील पत्त्यावर हस्त पोहोच करावा.
पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय, कै.भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफ खाना शिवाजीनगर, पुणे ०५.
अटी व शर्ती?
१) जन्म तारखेच्या पुराव्यासाठी जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्देयाचा दाखला किंवा इ.१० उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र साक्षांकित करून द्यावे लागेल.
२) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गातून अर्ज करीत असल्यास जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक राहील.
३) महिला विवाजित असेल तर विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
४) अर्ज विहित कालावधीत सादर करावा.अन्यथा आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
५) अर्ज करताना आपला मोबाईल नंबर आणि इ-मेल आयडी देणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीकरिता/अर्जाच्या प्रतीसाठी : www.pmc.gov.in संकेतस्थळाला भेट द्या.