जिल्हा परिषद योजना सुरु | Zilla Parishad Yojana 2022

Zilla Parishad Yojana


Zilla Parishad Yojana 2022 :
नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी जिल्हा परिषद योजना सुरु झाली आहे.

जिल्हा परिषद (Zilla Parishad) कृषी विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या विविध योजना शासनाच्या ५ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार डीबीटी (DBT- Direct Benifit Transfer) पद्धतीने राबविण्यात येत आहेत.

लाभार्थींना योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करून योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. या लेखात आपण योजनेसाठी अर्ज कोठे करावा, पात्रता काय असेल, योजनेबद्दल सविस्तर माहिती त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे इ. बद्दल माहिती यालेखात दिलेली आहे.

जिल्हा परिषद योजना – कृषी विभाग योजना | Zilla Parishad Yojana 2022

जिल्हा परिषद पुणे जिल्हा पारिषद निधी अंतर्गत कृषी विभाग मार्फत ७५% अनुदानावर योजना राबविण्यात येणार आहेत. योजनेसाठी नागरिकांना ऑफलाईन अर्ज करावयाचा आहे. पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद संकेतस्थळावर उपलब्ध असून तो अर्ज भरून त्यास आवश्यक असणारी कागदपत्रे जोडावी. हा अर्ज+कागदपत्रे २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत पंचायत समिती कार्यालयामध्ये जमा करावा.तसेच विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन सेंटर किंवा झेरॉक्स सेंटर वरती मिळेल. खाली फॉर्मची लिंक सुद्धा दिलेली आहे.

Zilla Parishad Yojana List | कृषी विभाग योजना लिस्ट

योजना नं. १ | ७५% अनुदानावर शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य

अ.क्र.जिल्हा परिषद कृषी विभाग योजना यादी
१}७.५ HP ओपनवेल विदुयुत मोटर संच
२)३.० HP ओपनवेल विदुयुत मोटर संच
२}५.० HP ओपनवेल विदुयुत मोटर संच किंवा
३}५.० HP डीझेल इंजिन पंप संच
४}३.० इंची PVC पाईप किंवा २.५ इंची PVC पाईप
५}कडबाकुट्टी यंत्र २ एचपी विद्युत मोटर सहित (हॉरीझंटल मॉडेल)
६}3.2 kg/cm2 , HDPE पाईप क्लिप सहित किंवा क्लिप विरहित
७}प्लास्टिक ताडपत्री
८}प्लास्टिक क्रेट
९}हॉरीझंटल ट्रिपल पिस्टन स्प्रे पंप इंजिन ऑईल सह
१०}ट्रॅक्टरचलित सरीरिजर (दोन फळी)
११}बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक Spray Pump
ग्रामपंचायत यादी पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.
७५% अनुदानावर शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य
योजनाजिल्हा परिषद, Zilla Parishad
अर्ज करण्याची अंतिम मुदत.२२ ऑगस्ट २०२२
कोणत्या जिल्ह्यासाठी योजना सुरु आहे.पुणे
अर्ज करण्याची कार्यपद्धतीऑफलाईन
जिल्हा परिषदेचे संकेतस्थळhttps://punezp.mkcl.org/
महा लाभार्थी जिल्हा परिषद संकेतस्थळपहा
कृषी औजारे अर्जाचा नमुनापहा
जिल्हा परिषद जाहिरातपहा
Zilla Parishad Yojana Pune 2022

जिल्हा परिषद योजनेसाठी पात्रता काय आहे?

  • लाभार्थी स्वत: शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • १० एकर पेक्षा कमी क्षेत्र असावे.
  • शेतकरी लाभार्थी अल्प/अत्यल्प भूधारक असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय खुला सर्व संवर्गातील शेतकरी औजाराचा/वस्तूचा लाभ घेण्यास पात्र राहतील.
  • लाभार्थीकडे आधार कार्ड तसेच बँक पासबुक ( बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आसवे) व रेशन कार्ड असावे.
  • ७/१२, ८ अ

योजना नं. २ | अपारंपरिक उर्जा स्त्रोत निर्माण करणे आणि सौर प्रकल्प कार्यान्वित करणे.

लाभार्थीला २०० लि. प्रतिदिन क्षमता असलेले सोलर वाॅटर हिटर सयंत्र लाभ घेण्यासाठी प्रथम स्वतः सयंत्र खरेदी करायचे आहे.त्यानंतर तपासणी करून लाभार्थीच्या बँक खात्यावर खरेदी रकमेच्या ७५% रक्कम वर्ग केली जाईल.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?

  • वरीलप्रमाणे
  • सोलर वॉटर हिटर सयंत्राचा परीक्षण केलेचा पुरावा.
  • सोलर वॉटर हिटर सयंत्र विक्रेत्यास स्वताच्या बँक खात्यातून यंत्राची रक्कम पाठविली याचा पुरावा (बँक स्टेट मेंट/NEFT/RTGS/IMPS)
सोलर वॉटर हिटर सयंत्र अर्जाचा नमुनापहा
अधिक माहितीपहा
जिल्हा परिषद पुणे

योजना नं. ३ | नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे.

मिळणारा लाभ : गाय,शेतकरी प्रशिक्षण/अभ्यास दौरा,गांडूळ खात निर्मिती सयंत्र, जैविक खाते आणि जैविक किडकनाशके बायो डायनामिक खत युनिट,हिरवळीची खते, सेंद्रिय शेतमाल उत्पादन प्रमाणीकरण.

जिल्हा परिषद योजनेसाठी अनुदान किती आहे?

जिल्हा परिषद योजना वरील घटकासाठी ७५% अनुदान देय राहील.

ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद योजना यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *