City survey utara online | घराचा उतारा Online काढा
City survey utara online : नमस्कार मित्रांनो आपल्याला बऱ्याच वेळेस घराचा जागेचा उतारा लागतो.
City survey utara online.
मित्रांनो आपल्याला जर कर्ज घ्यायचे असेल तर कर्ज घेण्यासाठी आपल्याला सिटी सर्वे उतारा लागतो. हा जर उतारा आपल्याकडे नसेल तर आपल्याला कर्ज मिळत नाही. “City survey utara online“
अशा वेळेस आपल्याला जर घराचा जागेचा उतारा काढायचा असेल तर आपल्याला भूमि अभिलेख कार्यालयात जावे लागते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की घराच्या जागेचा उतारा काढण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात काय जाण्याची गरज? घराच्या जागेचा उतारा तर ग्रामपंचायत मध्ये मिळतो.
मित्रांनो घराच्या जागेचा उतारा हा ग्रामपंचायत मध्ये पण मिळतो. परंतु आपल्याला जर कर्ज घ्यायचे असेल किंवा इ. कामासाठी “सिटी सर्व्हे उतारा” म्हणजेच C.T.S उतारा आपल्याला लागतो.
डिजिटल स्वाक्षरीचा city survey utara उतारा काढण्यासाठी आपल्याला शुल्क भरावे लागते. डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे आपण कोणत्याही शासकीय किंवा वैयक्तिक कामासाठी वापरू शकता. डिजिटल स्वाक्षरी असल्यामुळे कोणत्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाही.
विना स्वाक्षरी (C.T.S) उताऱ्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु विना स्वाक्षरी असल्यामुळे याचा वापर फक्त पाहण्यासाठीच होतो. आपण कोणत्याही कामासाठी तो वापरता येणार नाही.
City survey utara आपण कसा काढायचा याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे.
सिटी सर्व्हे म्हणजे काय?
“सिटी सर्व्हे उतारा” म्हणजेच मालमत्ता पत्रक होय. जर आपल्याला property card/मालमत्ता पत्रक/city survey utara काढायचा असेल, तर भूमिअभिलेख कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागत असे. अर्ज केल्यानंतर तुम्हाला हा उतारा दिला जायचा. परंतु आता आपण आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन उतारा काढू शकतो.
“ग्रामपंचायत घराचा उतारा” कसा काढायचा?
घराचा उतारा आपण ग्रामपंचायत मध्ये काढू शकता. तसेच जर आपल्याला C.T.S उतारा म्हणजेच घराच्या जागेचा उतारा काढायचा असेल तर आपण ऑनलाईन काढू शकता.
सिटी सर्व्हे नंबर कसा शोधायचा?
- सिटी सर्व्हे नंबर शोधण्यासाठी महाभूलेख वेबसाईट चा वापर करावा.
- महाभूलेख वेबसाईट – येथे क्लिक करा.
- आपल्याला महाराष्ट्र नकाशा पाहायला मिळेल. त्यामध्ये आपल्या जिल्ह्यावर क्लिक करा.
- नवीन विंडो/पेज ओपन होईल.
- त्यामध्ये तुम्हाला
- ७/१२
- ८अ
- मालमत्ता पत्रक
- वरील प्रमाणे पर्याय दिसतील. त्यामध्ये मालमत्ता पत्रक वरती क्लिक करा.
- नंतर आपला जिल्हा निवडा.
- उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय म्हणजेच आपला तालुका निवडावा आणि गाव निवडावे.
- C.T.S No./न. भू.क्र.
- पहिले नाव > मधील नाव > आडनाव > नाव शोधा हे पर्याय दिसतील.
- वरीलपैकी आपण कोणताही पर्याय निवडू शकता नंतर त्यानुसार खालील चौकोनात नाव टाका.
- उदा. मधील नाव म्हणजेच वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव.
- शोधा बटन वर क्लिक करा.
- आपण टाकलेल्या नावाशी जुळणारी सर्व नावे नाव निवडामध्ये पहायला मिळतील..
- त्यामधून आपले नाव निवडा. खालच्या बॉक्स मध्ये आपला मोबाईल नंबर टाकावा. आणि मालमत्ता पत्रक पहा वरती क्लिक करा.
- नवीन विंडो सुरु होईल चौकोना समोरील अक्षरे/Captcha मोकळ्या चौकोनात क्लिक करून भरून घ्यावा.
- verify captcha to view property card पर्यायावर क्लिक करावे.
- आपल्या समोर City survey utara online “सिटी सर्व्हे उतारा” पहायला मिळेल.
- नगर भूमापन क्रमांक म्हणजेच आपला सिटी सर्व्हे नंबर होय.
City survey utara online उतारा आपण ऑनलाईन काढू शकता. सिटी सर्व्हे उतारा काढण्यासाठी – येथे क्लिक करा.
“ग्रामपंचायत घराचा उतारा” आपल्याला ऑनलाईन काढता येत नाही. अजून पर्यंत हि सेवा सर्व ग्राम पंचायत मध्ये सुरु नाही. यामुळे ग्रामपंचायत घराचा उतारा काढायचा असेल तर आपण ग्राम पंचायत मधूनच काढावा.
Sir, it is very essential information in our own marathi language so first hats off you.