New “CSC Registration” Online 2024; असे करा सीएससी रजिस्ट्रेशन ऑनलाईन

CSC Registration Process in marathi

New CSC Registration 2024 : सीएससी केंद्र म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर होय. यालाच महाराष्ट्र मध्ये आपले सरकार सेवा केंद्र/ऑनलाईन सुविधा केंद्र/जन सुविधा केंद्र असे म्हणतो. “csc onilne registration” सीएससी केंद्र घेण्यासाठी नक्की काय प्रोसेस असते. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात व सीएससी मार्फत आपण कोणत्या सुविधा देऊ शकतो. याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

CSC Registration Process in marathi

कॉमन सर्व्हिस सेंटर करिता नोंदणी करण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही अगदी घरबसल्या कॉम्पुटर किंवा Laptop वरून आपण नोंदणी करू शकता.

केंद्रासाठी नोंदणी करण्यापूर्वी तुम्हाला एक “tec exam for csc” परीक्षा द्यावी लागेल. त्यामध्ये आपण पास झाल्यास त्याचे प्रमाणपत्र सुद्धा मिळते. परीक्षा पूर्ण ऑनलाईन असणार आहे. त्यासाठीचा अभ्यासक्रम हा पोर्टल वरती तुम्हाला मिळेल. टीईसी प्रमाणपत्र (TEC Exam certificate) हे तुम्हाला सीएससी रजिस्ट्रेशन (CSC Registration) करताना लागते.

TEC प्रमाणपत्र नसेल तर सीएससी रजिस्ट्रेशन करता येणार नाही यामुळे आपण टीईसी परीक्षा देणे आवश्यक आहे.

रजिस्ट्रेशन “CSC Registration” करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे/माहिती

 • सर्वप्रथम अर्जदाराकडे आधार कार्ड असावे तसेच कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे.(आधार कार्डशी मोबाईलनंबर लिंक असावा)
 • PAN कार्ड
 • बँक खाते कॅन्सल चेक
 • कॉम्पुटर हाताळणे माहिती असावे.
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आय डी
 • अर्जदाराचा फोटो

अर्ज/नोंदणी करताना घ्यावयाची काळजी

 • संपूर्ण माहिती अचूक भरावी. चुकीची माहिती आढळल्यास आपला अर्ज रिजेक्ट होऊ शकतो.
 • वैयक्तिक केंद्र घ्यायचे असल्यास नोंदणी {CSC Registration} करताना CSC VLE हा पर्याय निवडावा.
 • सर्व कागदपत्रे दिलेल्या साईजमध्ये Scan करून ठेवावी. तसेच स्पष्ट दिसत असावी.
 • सीएससी/CSC च्या अधिकृत साईटवरती जावूनच नोंदणी करावी.
 • नोंदणी करण्यासाठी टीईसी/TEC प्रमाणपत्र आवश्यक आहे.

सीएससी रजिस्ट्रेशन कुठे करावे?

 • https://register.csc.gov.in/register या साईट वरती आपण कॉमन सर्व्हिस सेंटर करिता म्हणजेच “CSC” करिता नोंदणी करू शकता.
 • TEC Certificate करिता https://cscentrepreneur.in/ या अधिकृत साईट वरूनच नोंदणी करावी? इतर कोणत्याही साईट वरती नोंदणी करू नका.

CSC Registration Process – सीएससी रजिस्ट्रेशन कसे करावे?

 • कॉम्पुटर वरती सीएससी रजिस्ट्रेशन ची साईट ओपन करावी.
 • सर्वप्रथम तुम्हाला CSC VLE हा ऑप्शन निवडायचा आहे.
 • त्यानंतर TEC रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र कमांक तसेच मोबाईल नंबर टाकून घ्यावा.
 • Captcha कोड टाकून सबमिट करावे. पुन्हा एक नवीन फॉर्म ओपन होईल.
 • त्यामध्ये ई-मेल व मोबाईल नंबर पाहायला मिळेल. तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावा लागेल.
 • Gender, लोकेशन इ. माहिती भरावी.
 • Authentication Type : OTP, FMR, IIR हे पर्याय दिसतील. त्यामधून आपण OTP/ओटीपी हा पर्याय निवडू शकता.
 • खालील Cap+tcha अक्षरे भरा आणि सबमिट/Submit करा. त्यानंतर generate otp वरती क्लिक करा.
 • तुमच्या आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर वर ओटीपी येईल. तो टाकून Validate करा.
 • अर्जदाराचा फोटो अपलोड करावा लागेल.
 • त्यानंतर शॉप/दुकानाचे नाव आणि पत्ता टाकायचे आहे.
 • PAN कार्ड माहिती, बँकिंग माहिती भरावी आणि केवायसी कागदपत्रे अपलोड करा,
 • सबमिट वरती क्लिक करा, आपले सीएससी रजिस्ट्रेशन यशस्वी होईल.

तुमच्या ई-मेल वरती एक रेफरन्स नंबर मिळेल. या नंबरवरून आपण अर्जाचे स्टेटस चेक करू शकता.

केंद्रामध्ये आवश्यक साधने

 1. कॉम्पुटर किंवा Laptop
 2. Printer./प्रिंटर/कलर प्रिंटर
 3. वेब कॅमेरा/Web Camera
 4. इनव्हर्टर/UPS/बॅटरी बॅकअप
 5. इंटरनेट कनेक्शन
 6. बायोमेट्रिक डिव्हाईस

CSC Service Works

कॉमन सर्व्हिस सेंटरच्या “CSC “माध्यमातून खूप साऱ्या सेवा आपण देऊ शकतो. आधार कार्ड, PAN कार्ड, विविध योजना, बँकिंग, शेतकरी योजना, आवास योजना, आयुष्मान भारत योजना, मतदान कार्ड सेवा, आरोग्य सेवा, इन्शुरन्स, कौशल्य, शैक्षणिक सेवा, मोबाईल रिचार्ज, वीज बिल भरणा अशा अनेक सुविधा आपण सीएससी केंद्राच्या माध्यमातून देऊ शकतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *