वसंतराव नाईक कर्ज योजना, संपूर्ण माहिती : Vasantrao Naik Karj Yojana

Vasantrao Naik Karj Yojana

Vasantrao Naik Karj Yojana : वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमाती विकास महामंडळ मार्फत लाभार्थीला उद्योगाकरिता १० लाख कर्ज मर्यादेपर्यंतचा व्याज परतावा दिला जातो. “vasantrao naik karj yojana” यासाठी काही अटी व शर्ती आहेत. येथे तुम्हाला योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.

VJNT Loan Scheme 2024

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमाती महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. “vasantrao naik mahamandal karj yojana” तरुणांना योजनेचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायास सुरुवात करता येणार आहे.

व्यवसायाकरिता वैयक्तिक कर्ज किंवा गट/ग्रुप कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत मिळते. वैयक्तिक कर्ज योजना व गट कर्ज यामध्ये कर्जाची मर्यादा वेगवेगळी आहे. इच्छुक अर्जदारांना http://www.vjnt.in/ या पोर्टल वरती अर्ज करावा लागेल.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना

योजनेचे नाववसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमाती विकास महामंडळ
अर्ज कुठे करावाhttp://www.vjnt.in/
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
शासन निर्णयवरील साईट वरती पाहायला मिळेल
vjnt laon scheme
  • वैयक्तिक कर्ज व्याज परतावामध्ये लाभार्थ्याने जर नियमित कर्ज फेड केली नाही तर त्याला व्याज परतावा दिला जाणार नाही.

वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमाती विकास महामंडळ

  • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असायला हवा.
  • अर्जदाराचे वय हे १८ ते ५० वर्ष दरम्यान असावे.
  • आधार कार्ड बँक कर्ज खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार कोणत्याही बँकेचा थाबाकीदर नसावा.
  • कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ दिला जाईल.

अर्ज करण्याची कार्यवाही

अर्जदाराला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. अर्ज करण्यासाठी लाभार्थीकडे खालील कागदपत्रे असावे.

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • बँक खाते पुस्तक/पासबुक
  • जात प्रमाणपत्र
  • एक फोटो
  • PAN कार्ड
  • रेशन कार्ड
  • प्रोजेक्ट रिपोर्ट/कोटेशन
  • उत्पन्न दाखला
  • इतर

अर्ज करण्यासाठी पोर्टल वरती दोन फॉर्म दिलेले आहेत, “वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना” व “गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना” हे दोन फॉर्म आहेत. अर्ज केल्यानंतर अर्जाची तपासणी केली जाईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्यास अर्जदारास पूर्वसंमतीपत्र मिळेल. पूर्व संमती पत्र अर्जदाराला ऑनलाईन मिळेल. त्यासाठी पोर्टल वरती लॉग इन करावे लागेल.

www vjnt gov in

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *