ग्रामपंचायत ऑपरेटर ची कामे/कर्तव्ये

Gram Panchayat Operator Work

Gram Panchayat Operator Work :

राज्यातील ग्रामपंचायत मध्ये ११ ऑगस्ट २०१६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे आपले सरकार सेवा केंद्र हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

त्या अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र राज्यातील ग्रामपंचायत मध्ये स्थापन करण्यात आले आहे.

याची जबाबदारी केंद्र शासन पुरस्कृत कंपनी सीएससी-एसपीव्ही कडे सोपविण्यात आली आहे.

आपले सरकार केंद्रचालक याची नियुक्ती हि सीएससी-एसपीव्ही कडून करण्यात आली आहे.

आपले सरकार केंद्र चालक याची कर्तव्ये | कामे

G2G Services
  • १) ग्रामपंचायतींच्या लेखा संहिता २०११ मधील दैनंदिन कामकाजाचे १ ते ३३ नमूने Egram सॉफ्टमध्ये संगणकीकृत करणे.
  • २) ई पंचायत कार्यक्रमांतर्गत EgramSwaraj आज्ञावली (११NIC Application) मध्ये माहिती अद्यावत करणे.
  • ३) जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाबाबत आयोजीत बैठक / प्रशिक्षणास उपस्थित राहून ग्रामसेवक व सरपंच/ उपसरपंच यांना अवगत करणे
G2C Services
  • १) ग्रामपंचायतीद्वारे देण्यात येणारे १ ते १९ दाखले/प्रमाणपत्र (GRC) संगणकीकृत करणे व वितरीत करणे.
  • २) आपले सरकार पोर्टलद्वारे ग्रामपंचायत स्तरावर देण्यात येणाऱ्या सेवा व दाखले संगणकीकृत करणे व वितरीत करणे.
  • ३) राईट टू सर्व्हिसेस अॅक्ट अंतर्गत येणा-या सेवा ग्रामपंचायत स्तरावर वितरीत करणे.
  • ४) केंद्र चालक हा स्वतंत्र उद्योजक असल्याकारणाने अर्थार्जनाकरिता इतर व्यावसायिक सुविधा ग्रामविकास विभागाने पूर्व परवानगी दिलेली अथवा त्यांच्याकडून पूर्व परवानगी घेऊन इतर विभागाने दिलेली कामे.
B2C Services
  • १) ग्रामपंचायतींशी संबंधित नसलेल्या व लोकांसाठी उपयोगी इतर सेवा (BRC) संगणकीकरणामार्फत उपलब्ध करणे. उदा. रेल्वे बस आरक्षण, मोबाईल/डिटीएच रिचार्ज, वीज बिल भरणे, आधार कार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट नोंदणी इत्यादी.
Fi
  • १) ग्रामपंचायत स्तरावर बँकिंग सेवा वितरीत करणे.
  • २) विमा हप्ते भरणे / विमा वितरीत करणे इत्यादी.

Similar Posts

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *