घराचा उतारा Online कसा काढायचा पहा : City Survey Utara Online

घराचा उतारा Online काढा मोबाईलवरून – city survey utara online : नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण घराच्या जागेचा उतारा म्हणजे सिटी सर्वे उतारा ऑनलाइन कसा काढू शकता. तसेच हा उतारा तुम्ही मोफत कसा काढायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
City Survey Utara Online
C.T.S./जागेचा उतारा काढण्यासाठी आपल्याला खूप धावपळ करावी लागत भूमिअभिलेख कार्यालयात/तालुक्याच्या ठिकाणी जायला लागत असे. भूमिअभिलेख कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागत असे, नंतरच आपल्याला C.T.S (city survey utara) उतारा म्हणजेच सिटी सर्वे उतारा मिळत असे परंतु आता हा उतारा काढण्यासाठी कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपण घर बसल्या उतारा मोबाईल वरून पाच मिनिटात काढू शकता.
घराचा उतारा कसा काढायचा?
घराच्या जागेचा उतारा म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड हे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून काढण्यासाठी तुमच्याजवळ सिटीएस नंबर असणे आवश्यक नाही. आपण हे कार्ड/उतारा आपले पहिले नाव, वडिलांचे नाव किंवा आडनाव इ. आपण काढू शकता.
घराचा उतारा online काढण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- city survey utara काढण्यासाठी भुमिअभिलेख अधिकृत संकेतस्थळावरती जायचं आहे. यासाठी आपण मोबाईल मधील गुगल क्रोम चा वापर करा.
- संकेतस्थळ : https://bhulekh.mahabhumi.gov.in/
- किंवा आपण क्रोम मध्ये सर्च बार या चौकोनात Mahabhulekh असे टाइप करून सर्च करा.
- प्रथम क्रोम मध्ये उजव्या बाजूला वरती 3 डॉट वरती क्लिक करा आणि डेस्कटॉप/Desktop मोड हा पर्याय निवडा. यामुळे तुम्हाला कॉम्पुटर वरती जशी स्क्रीन असते तशी तुम्हाला मोबाईल वरती पहायला मिळेल.
- प्रथम तुम्हाला भूमी अभिलेख विभागाची अधिकृत वेबसाईट पाहायला मिळेल या वेबसाईट वरती क्लिक करा.
- अधिकार अभिलेखाचा प्रकार या पर्यायाखाली ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक (Property Card) हा पर्याय निवडा.
- मालमत्ता पत्रक माहिती मध्ये आपला जिल्हा निवडा.
- पुन्हा आपल्यासमोर नवीन पेज उघडेल.
- यामध्ये तुम्हाला ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक इ पर्याय दिसतील घराचा उतारा काढण्यासाठी मालमत्ता पत्रक हा पर्याय निवडा.
- यानंतर आपला जिल्हा निवडावा लागेल.
- नंतर आपला तालुका निवडावा लागेल नंतर आपले गाव निवडावे लागेल.
- आपल्याला जर सीटीएस नंबर माहिती नसेल तर आपण पहिले नाव, मधले नाव आणि आडनाव याद्वारे उतारा काढू शकता.
- पहिले नाव हा पर्याय निवडा खालील चौकोनात आपले नाव टाका आणि शोधा वरती क्लिक करा.
- समोर तुमच्या नावाची जुळत असलेली संपूर्ण नावाची यादी पहायला मिळेल या मधून आपले नाव निवडा.
- खालील चौकोनात चालू आपला मोबाईल नंबर टाका.
- खालील चौकोनातील CAPTCHA कोड भरा आणि सबमिट वरती क्लिक करा.
- आपल्या समोर नवीन विंडो ओपन होईल व सर्व्हे उतारा पाहायला मिळेल.
Here we have given the complete process to find CTS number. Click here to see how to find CTS number.
अशाप्रकारे आपण आपल्याला जागेचा उतारा पाहायला मिळेल. असेच नवीन लेख माहिती मिळवण्यासाठी BS Aaple Sarkar हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.