CSC मध्ये सुरु झाली नवीन सेवा : CSC New Service
CSC New Service : CSC मध्ये वेळोवेळी अपडेट नवीन सेवांचा समावेश करण्यात येत आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये मागील काही दिवसात सर्व मजूर कामगारांसाठी इ-श्रम कार्ड नोंदणी सुरु करण्यात आली.
E Shram Card
सर्व मजूर/कामगारांना ई श्रम कार्ड नोंदणी करण्यासाठी मागील काही दिवसापूर्वी CSC मध्ये नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली . परंतु सीएससी (Common Service Center) मध्ये ई-श्रम कार्ड अपडेट करता येत नव्हते. परंतु आता CSC मध्येच ई श्रम कार्ड मध्ये काही चुकीची झाल्यास आपण ते CSC मधून काही मिनिटातच अपडेट करता येणार आहे.
आपण https://digitalseva.csc.gov.in/ वरून लॉग इन केल्यास तुम्हाला ई-श्रम कार्ड अपडेट सुविधा पोर्टल वरती दिसणार नाही. यासाठी आम्ही तुम्हाला ई-श्रम कार्ड अपडेट सुविधा पोर्टलची लिंक येथे देणार आहोत.
e shram card update csc login
- ई-श्रम कार्ड अपडेट करण्यासाठी https://eshram.csc-services.in/ या पोर्टलचा वापर करा.
- CSC Log in करा.
- ई-श्रम कार्ड अपडेट करण्यासाठी Update Profile या पर्यायामध्ये ई-श्रम कार्ड काढताना जो मोबाईल नंबर टाकला होता तो नंबर टाकून घ्या.
- Captcha कोड टाका Request OTP वरती क्लिक करा.
- मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी येईल हा OTP टाका.
- Validate OTP बटन वरती क्लिक करा.
- Aadhaar Number समोरील चौकोनात आपला आधार नंबर टाका.
- खालील captcha कोड भर Validate Aadhaar वरती क्लिक करा.
- आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर लिंक असलेल्या नंबर वरती एक OTP जाईल.
- Otp verify करून घ्या. तुम्हाला नवीन पेज सुरु होईल. त्यामध्ये आधार कार्ड वरील फोटो आणि आधार वरील माहिती पाहायला मिळेल.
- खालील चौकोनात क्लिक करा आणि Continue To Enter Other Details वरती क्लिक करा.
- आपल्याला जो बदल करायचा आहे. तो आपण पुढे करू शकता.