“महाडिबीटी” पोर्टल वरील अर्जाबद्दल माहिती | mahadbt farmer

maha dbt aaplication

mahadbt farmer : शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती आपण जर शेतीविषयक योजनांचा लाभ घ्यायचा विचार करताय तर आता चिंता करू नका.

कारण शेतकरी आता स्वतः मोबाईल वरून कोणत्याही योजनेसाठी अर्ज करू शकतो. फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन सेंटर वरती जाण्याची आवश्यकता नाही.

How to apply mahadbt farmer scheme

घरी बसून स्वतः अर्ज करू शकतो. एकाच पोर्टल वरती (mahadbt farmer portal) अर्ज करावा लागेल. यामध्ये तुम्ही शेती संबंधित सर्व प्रकारची अवजारे शेती उपयोगी साहित्य बियाणे औषधे खते इ. घटकासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. आपण एकाच अर्जामध्ये विविध योजनांसाठी अर्ज करू शकता.

यामुळे शेतकऱ्याचा वेळ वाचेल आणि पैसे सुद्धा खर्च होणार नाहीत. आपण अर्ज केल्यानंतर फक्त एकाच वेळेस पेमेंट करावे लागेल.

पुन्हा त्यातील योजनेच्या घटकासाठी अर्ज करताना पुन्हा पेमेंट करावे लागणार नाही.

[ mahadbt farmer ] अर्ज कोठे करायचा?

MAHA-DBT (महाडिबीटी) पोर्टल वरती अर्ज करावयाचा आहे.

MahaDBT पोर्टल वरती खालील घटकासाठी आपण अर्ज करू शकता.

  • “महाडिबीटी” पोर्टल वरती अर्ज करण्यासाठी आपण शेतकरी असायला हवे तसेच आपल्या नावे ७/१२ उतारा बंधनकारक आहे.
  • शेतकरी अर्ज करतांना स्वतः चे आधार कार्ड,PAN कार्ड,राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक किंवा इतर कोणत्याही बँकेचे चालेल परंतु त्या बँकेचा IFSC कोड असणे आवश्यक आहे.तसेच ७/१२,८ अ असायला हवा.
  • शेतकरी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती असेल तर जातीचा दाखला असणे बंधनकारक शेतकरी नवीन अर्ज करण्यासाठी आधार कार्डशी मोबाईल नंबर हा लिंक असणे बंधनकारक आहे.
  • आपला मोबाईल नंबर आधा कार्ड शी लिंक नसेल तर आपल्याला बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याला आपले सरकार सेवा केंद्र वरती जाऊन नोंदणी करावी लागेल.

आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर काय करावे लागेल?

  • आपला मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक नसेल तर आपण आधार केंद्र किंवा बँक तसेच पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करू शकता.
  • मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट करावे लागेल. या साठी स्वतः उपस्थित राहून अपडेट करावे लागेल.

अर्ज करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर काय करावे?

  • आपल्याकडे आधार कार्ड नसेल आधार कार्ड काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे घेऊन आधार केंद्र वरती आधार कार्डसाठी नवीन नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला मिळालेली पावती घेऊन आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र/ऑनलाईन सेवा केंद्रा वरती जाऊन महाडीबीटी (MAHA-DBT) पोर्टल वर नोंदणी करू शकता.

अर्ज भरताना चुकीची माहिती झाली तर काय करावे?

  • अर्ज करताना अर्जाची प्रोफाईल माहिती बरोबर भरल्याची खात्री करा. कारण अर्ज केल्यानंतर अर्जाची निवड झाल्यानंतर अर्ज करताना भरलेली माहिती चुकीची असेल तर यावेळी आपण अर्ज दुरुस्त करू शकत नाही.
  • अर्जाची निवड झाली तरी तो अर्ज तुम्हाला रद्द करावा लागेल. आणि पुन्हा प्रोफाईल दुरुस्त करून नवीन अर्ज करावा लागेल?

एकदा अर्ज केल्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा अर्ज करावा लागेल का?

  • नाही. शेतकऱ्याने एकदा अर्ज केल्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
  • आपला पाठीमागचा अर्ज पुढील वर्षासाठी ग्राह्य धरला जाईल.

अर्ज केल्यानंतर काय करावे? अर्जाची पावती कोठे द्यावी?

  • महाडीबीटी पोर्टल वरील अर्जाची संपूर्ण कार्यवाही ऑनलाईन आहे. यामुळे अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याला कोठेही जाण्याची गरज नाही.
  • अर्ज केलेली पावती कोठेही जमा करायची नाही.

अर्जाची निवड झाल्यानंतर काय करावे?

  • अर्जाची निवड झाल्यानंतर आपली कोणत्या घटकासाठी निवड झाली आहे. हे तपासा नंतर निवड झालेल्या घटका नुसार लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • कागदपत्रे अपलोड करताना काही अडचण येत असल्यास संबधित कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *