अपंगासाठी महा शरद पोर्टल सुरु | Maha Sharad Portal Registration

Maha Sharad Portal Registration

Maha Sharad Portal Registration Benefit : MAHA SHARAD Portal (Mahrashtra System For Health And Rehabilitation Of Divyang) दिव्यांगांसाठी कोणाला मदत करायची असेल ते या पोर्टल द्वारे मदत करू शकतील.

महाशरदपोर्टल द्वारे दिव्यांगांना मदत मिळेल. दिव्यांग व्यक्तींना काही मदत हवी असल्यास ते महाशरद पोर्टल वरती नोंदणी करू शकतात.

“महा शरद पोर्टल” काय आहे?

महा शरद पोर्टल दिव्यांग व्यक्ती आणि समाजातील दानशूर व्यक्ती सामाजिक संस्था व कंपन्या यांना विनामूल्य जोडणारा दुवा म्हणजे हे महा शरद पोर्टल अभियान आहे. दिव्यांगांना व्यासपीठ तयार करून देणे यामध्ये विविध भागातील सर्व कोणतेही दिव्यांग व्यक्ती आपले नाव सहजरीत्या नोंदवू शकतात. त्यांना लागणाऱ्या मदतीसाठी देणगीदार मदत देऊ शकतात.

दिव्यांगासाठी महा शरद पोर्टलचा होणार फायदा. | Maha Sharad Portal Registration Benefit

  • दिव्यांग व्यक्तींनी महा शरद पोर्टल वरती नोंदणी केल्यानंतर जे देणगीदार देणगी देण्यास इच्छुक असतील ते महाशरथ पोर्टलवर देणगी देऊन दिव्यांग व्यक्तींना मदत करू शकतात.
  • दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमूद केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंचावर म्हणजेच महा शरद पोर्टल “Maha Sharad Portal Registration” वर नोंदणी करून त्यांना आवश्यक ती मदत तसेच सहकार्य मिळवू शकतात.

महा शरद पोर्टल दिव्यांग व्यक्ती दानशूर व्यक्ती तसेच सामाजिक संस्था कंपन्या यांना विनामूल्य जोडणारा दुवा आहे. म्हणजेच महाशरथ पोर्टल हे विनामूल्य मंच आहे.

योजना सुरु कोणी केली.महाराष्ट्र शासन
योजनाMAHA SHARAD
योजनेचा लाभसर्व दिव्यांग व्यक्ती घेऊ शकतात.
योजनेची अधिकृत वेबसाईटमहा शरद पोर्टल
अर्जाची प्रकियाऑनलाईन
Maha Sharad Portal Registration 2024

पोर्टलवर कोण नोंदणी करू शकतात?

महाशरद पोर्टलवर दिव्यांग व्यक्ती तसेच ज्या व्यक्ती देणगी देण्यासाठी इच्छुक असतील ते या पोर्टल वरती नोंदणी करू शकतात.

नोंदणी करण्यासाठी वयाची अट काय आहे?

नोंदणीसाठी वयाची अट नाही कोणतेही दिव्यांग व्यक्ती व देणगीदार पोर्टल वरती नोंदणी करू शकतो.

पोर्टल वरती कुठूनही नोंदणी करू शकतात?

  • पोर्टलवरती महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्ती नोंदणी करू शकतात.
  • संपूर्ण भारतातील व्यक्ती पोर्टलवर देणगीदार म्हणून नोंदणी करू शकतात.

दिव्यांग व्यक्तींना नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे माहिती?

  • अपंग प्रमाणपत्र (Unique Disability Certificate)
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
    • टीप : अपंग व्यक्तीकडे मोबाईल नंबर नसेल/मोबाईल नसेल तर PWD ला अवलंबून असलेला व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकून नोंदणी करू शकतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *