“आपली चावडी” गावातील जमिनीच्या खरेदी-विक्री ची संपूर्ण माहिती | Apali Chavadi
आपली चावडी (Apali Chavadi) : नमस्कार मित्रांनो आपल्या गावात गावातील कामे असतील,घराच्या नोंदी किंवा इतर कामा संदर्भात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर गावात आधी दवंडी दिली जाते. तसेच चावडी वर नोटीस लावली जाते. नंतरच ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा/सभा घेऊन पुढील निर्णय घेतला जातो. परंतु गावातील शेत जमिनी संदर्भात काही व्यवहार असतील किंवा इतर नोंदीबाबत काही कामे असतील तर याची कुठे नोटीस प्रदर्शित करतात? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तसेच मित्रांनो गावात किंवा शहरात आपली जमीन असते. त्या जमिनीचा जो ७/१२ असतो, गट असतो, त्यामध्ये अनेक शेतकरी असतात. “आपली चावडी”
आपली चावडी माहिती? | [Aapli chawdi]
पण काही वेळा असे होते कि, आपल्याच गटामधील कोणी शेतजमीन विकली किंवा कोणताही व्यवहार झाला तर त्याची आपल्याला माहिती नसते. परंतु जमीन विकणे हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुमचा जर त्यावरती आक्षेप असेल, तर यामुळे एकदा ७/१२ उतारा वरती नाव लागले कि, कोणी त्यावरती बोलून देत नाही. यामुळे आपापसात वाद निर्माण होतात, सर्वांचाच वेळ वाया जातो म्हणूनच मित्रांनो आपल्या आपल्या गटावर होणाऱ्या व्यवहारा बद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे, जेणेकरून आपण आधी सूचना देऊन पुढील निर्णय घेऊ शकतो.[आपली चावडी]
डिजिटल “आपली चावडी” काय आहे? | Apali chavadi
डिजिटल आपली चावडी “apali chawadi” मध्ये शेतकरी, गटावर झालेले व्यवहार म्हणजेच खरेदी-विक्री,वारस नोंदी, मोजणी नोटीस, इकरार, आदेश जमिनी संदर्भात कोणत्याही घडामोडी असो, याची संपूर्ण माहिती ७/१२ उतारा वरती नोंद होण्यापूर्वी डिजिटल आपली चावडी वरती प्रदर्शित केली जाते. विहित कालवधीत जर त्या नोंदीबाबत कोणाचीही तक्रार आली नसेल तर उक्त नोंदीस कोणाचीही हरकत नाही, असे समजून ७/१२ वरती नोंद घेतली जाते.“mahabhulekh apali chavadi”
७/१२ उतारा वरील नोटीस कशी पहावी? | aapali chavadi
नोटीस पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. वेबसाईट – येथे क्लिक करा
- या वेबसाईट वरती आल्यानंतर Digital Notice Board/ आपली चावडी हा पर्याय पाहायला मिळेल. आपली चावडी वरती क्लिक करा.
- आपल्या असमोर नवीन संकेतस्थळ ओपन होईल.
- यामध्ये प्रथम तुम्हाला जर शेती संबधित नोटीस पहायची असेल तर ७/१२ हा पर्याय निवडा.
- परंतु आपल्या गावातील सिटी सर्व्हे म्हणजेच गावतील जागे बाबत माहिती पहायची असले तर मालमत्ता पत्रक हा पर्याय निवडा.
- मोजणी संदर्भात नोटीस नोटीस पहायची असेल तर मोजणी हा पर्याय निवडा.
- ७/१२ हा पर्याय निवडा आणि नंतर आपला जिल्हा,तालुका,गाव निवडायचे आहे.
- खालील CAPTCHA टाकून “आपली चावडी पहा” (apali chavadi) वरती क्लिक करा.
आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल तुमच्या समोर काही नोटीस दिसतील. यामध्ये तुम्हाला फेरफार नोंदविल्याची तारीख, फेरफार नंबर, फेरफारचा प्रकार, हरकत नोंदविण्याची शेवटची तारीख, सर्व्हे नंबर/गट नंबर इ. माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या गटासमोरील पहा या वरती क्लिक केल्यानंतर सविस्तर माहिती पाहायला मिळेल.“Aapli chawdi”
“आपली चावडी” वेबसाईट | पहा |