शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाडीबीटी पोर्टलमध्ये झाला महत्वाचा बदल : MahaDBT Farmer Login Maharashtra

MahaDBT Farmer Login Maharashtra : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण आता शासनाने शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल वरती महत्वाचा असा बदल केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी सुरु केल्यापासून अनेक बदल करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे आताहि एक महत्वपूर्ण बदल केलेला आहे.
MahaDBT Farmer Login Maharashtra
महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पोर्टल वरती अर्ज करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना अनेक योजनांसाठी महाडीबीटी पोर्टल द्वारे अर्ज करता येतो.
अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असणे गरजेचे आहे. फार्मर आयडी द्वारे लॉगीन करून शेतकऱ्यांना अर्ज करता येतो, आता शासनाने यामध्ये बदल केला असून शेतकऱ्यांना आधार कार्ड नंबरद्वारे लॉगीन पर्याय सुरु केला आहे.
यापूर्वी महाडीबीटी पोर्टल वरती शेतकऱ्यांना लॉगीन करताना आधार नंबर द्वारे लॉगीन करता येत होते, त्यानंतर फार्मर आयडी ने लॉगीन होणे सुरु झाले व आधार नंबर लॉगीन बंद झाले होते. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या जसे फार्मर आयडी शोधावा लागत होता, फार्मर आयडी approve नसेल तर ओटीपी येत नसे.

आता शासनाने शेतकऱ्यांसाठी पुन्हा आधार नंबरने लॉगीन करण्याचा पर्याय सुरु केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता लॉगीन करण्यासाठी फार्मर आयडी माहिती नसेल तर आधार नंबर द्वारे लॉगीन करता येणार आहे.
महाडीबीटी पोर्टलद्वारे कोणत्या योजना राबविल्या जातात.
शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे एकूण १५ योजना राबविल्या जातात, जसे कृषी यांत्रिकीकरण योजना यामध्ये शेती संबधित लागणारी सर्व यंत्र औजारे, याचा समावेश आहे, , रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, कापणी यंत्र, मळणी यंत्र, नांगर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, सिंचन साधने योजना, बियाणे, खते, कांदाचाळ, फळबाग लागवड योजना, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाईप, इंजिन, मोटर औषध फवारणी पंप, फलोत्पादन योजना यामध्ये फळबाग शेतीसाठी लागणारी यंत्र औजारे इ. अशा विविध घटकाचा/योजनांचा महाडीबीटी पोर्टल वरती समावेश आहे.